पार्किन्सन्स आजारासाठी नवे उपचार

नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने पार्किन्सन्स सेंटर ऑफ एक्सलन्स, किंग्ज कॉलेज, लंडनच्या सहयोगाने भारतात पहिल्यांदाच पार्किन्सन्सच्या उपचारासाठी नवीन पद्धत अंमलात आणली आहे.

Mumbai
nanavati

नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने पार्किन्सन्स सेंटर ऑफ एक्सलन्स, किंग्ज कॉलेज, लंडनच्या सहयोगाने भारतात पहिल्यांदाच पार्किन्सन्सच्या उपचारासाठी नवीन पद्धत अंमलात आणली आहे. अॅपोमॉर्फिन पेन (PEN) आणि पंप (PUMP) भारतात लॉन्च झाले आहेत. पार्किन्सन्स हा वय वर्षे ५५ वरील लोकांना प्रभावित करणार्‍या काही सर्वसामान्य न्यूरोडीजनरेटीव्ह रोगांपैकी एक आहे. मंदपणा, ताठरपणा आणि कंप ही पार्किन्सन्सची लक्षणे असून तो एक विशिष्ट प्रकारचा न्यूरोडीजनरेटीव्ह रोग आहे आणि ज्याच्या उपचाराचे अत्यंत कमी पर्याय उपलब्ध आहेत. भारतात ७० ते ७९ वर्षांच्या वृद्धांमध्ये हा रोग वाढीस लागतो. पण यावर यशस्वी पद्धतीने उपचार व्हावे यासाठी नानावटी हॉस्पिटलने नवीन पद्धत अंमलात आणली आहे.

हा आजार हालचाली नियंत्रित करतो 

शरीरात डोपामाईनच्या कमतरतेमुळे हा रोग होतो. डोपामईन हे मेंदूमधील, विशेषतः केंद्र स्थानी असलेले एक केमिकल न्यूरो ट्रान्समिटर असते, जे हालचाली नियंत्रित करते. नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने पार्किन्सन्स सेंटर ऑफ एक्सलन्स, किंग्ज कॉलेज, लंडनच्या सहयोगाने भारतात पहिल्यांदाच पार्किन्सन्सच्या उपचारासाठी नवीन क्रांतिकारी पद्धत सुरू केली आहे, जी भारतात पार्किन्सन्सच्या उपचारांची पद्धत बदलेल. अॅपोमॉर्फिन PEN आणि PUMP ही उपचार पद्धत आता भारतात उपलब्ध असेल, जी पार्किन्सन्सच्या रुग्णांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणेल. राज्याचेआरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत आणि अभिनेता परेश रावळ यांच्या हस्ते ही उपचार पद्धत लॉन्च करण्यात आली.

पार्किन्सन्सच्या रूग्णांच्या उपचारांसाठी एक उत्तम

अॅपोमॉर्फिन एक अत्यंत निवडक असे डोपामाइन रिसेप्टर स्टिम्युलेटर आहे, जे मेंदूत चेतापेशींमधून डोपामाइनच्या स्रावास मदत करते, जे एरवी अनुपस्थित असते. याविषयी नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सीओओ डॉ. राजेंद्र पाटणकर यांनी सांगितलं की, “अॅपोमॉर्फिन हा पार्किन्सन्सच्या रूग्णांच्या उपचारांसाठी एक उत्तम शोध आहे. लंडनच्या किंग्ज कॉलेजशी संलग्न होऊन ही पद्धत भारतात आणण्यात आली आहे. ”

रुग्णात रोगाची लक्षणे वाढतात

नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील कन्सल्टंट पार्किन्सन्स डिसीझ अँड मूव्हमेंट डिसॉर्डर तज्ज्ञ डॉ. नींना शाह यांनी सांगितलं की, “शेवटच्या टप्प्यात असणार्या पार्किन्सन्सचा इलाज करणे खूप कठीण असते. रुग्णात रोगाची लक्षणे वाढत जातात आणि मानक औषधांच्या वाढत्या डोसमुळे त्याचे परिणाम देखील वाढतात. त्यामुळे, अशा रुग्णांसाठी ही उपचार पद्धत एक वरदान ठरेल.”

तर, अॅपोमॉर्फिन पेन दोन मिनिटांतच रूग्णाला अपेक्षित लाभ पोहोचवून काम सुरू करतात आणि त्या बर्‍याचशा प्रमाणात इन्शुलीन पेनसारख्याच वापरल्या जातात, असं लंडन, यूकेचे मूव्हमेंट डिसॉर्डर तज्ञ डॉ. विनोद मेटा यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here