न्यूयॉर्कमधून पनवेलमध्ये आलेला तरुण करोनो पॉझिटिव्ह!

Panvel
corona-virus
भारतात करोनाग्रस्तांची संख्या ८३४, तर १९ जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातून पनवेलमध्ये आलेल्या एका तरुणाची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या तरुणाला
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखलकरण्यात आले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील हा दुसरा करोनोबाधित रुग्ण
आहे. मात्र, पनवेल मधील पहिला पॉझिटिव्ह रुग्ण बरा झाला आहे. पनवेल मधील एकमेव करोना बाधित असलेला रुग्ण मागील आठवड्यात बरा होऊन घरी परतला आहे. पण आता पुन्हा एकदा पनवेल मध्ये करोनाचा रुग्ण आढळला आहे. तो अमेरिकेतील न्यूयॉर्क वरून भारतात आला होता. पनवेल महापालिकेद्वारे त्याला होम कोरंटाईन करण्यात आले होते. मात्र तपासणीत तो करोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

दरम्यान, त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या ३९ वर्षीय तरुणाला विमानतळावरून पनवेलला घेऊन येणाऱ्या टॅक्सी चालकाची देखील तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पनवेल महापालिका आयुक्त देशमुख यांनी दिली. त्या टॅक्सी चालकाचा शोध लावण्यात पालिकेला यश आले आहे.

महाराष्ट्रत गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आता राज्यातल्या करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १२४वर पोहोचला आहे. देशभरात हे रुग्णांचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकट्या मुंबईत ४०हून अधिक करोनाग्रस्त रुग्ण आहेत. देशभरात कुठल्याही शहरातल्या करोनाबाधितांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सक्तीने घरातच राहण्याचं आवाहन केलं जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here