नवरा पसंत नाही म्हणून नवविवाहितेने केला पतीचा खून!

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडीमध्ये नवरा पसंत नाही, म्हणून बायकोने नवऱ्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Mumbai
kalyan murder
कल्याण मर्डर विवाहितेला अटक

नवरा पसंत नसल्याच्या कारणावरून एका नवविवाहितेने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना कल्याण शहर परिसरात घडली आहे. वृषाली साळूंखे असे त्या खून करणाऱ्या पत्नीचे नाव असून तिला पोलिसांनी अटक केली आहे. मृत जगदीश आणि आरोपी वृषाली साळूंखे या दोघांच्या विवाहाला अवघे तीनच महिने झाले होते. शवविच्छेदन अहवालातूनच या खूनाचा उलगडा झाला आहे.

गळा दाबून हत्या

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील दुर्गामाता परिसरात साळूंखे दाम्पत्य वास्तव्यास आहे. जगदीश साळूंखे आणि वृषाली यांचा २९ डिसेंबर २०१८ रेाजी विवाह झाला होता. नवरा पसंत नसल्याने जगदीश आणि वृषाली या पती पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत असे. जगदीश आवडत नसल्याने त्याच्याबरोबर संसार करण्यास तिचा विरोध होता. त्यामुळे नावडत्या पतीचा कायमचाच काटा काढायचा असे तिने ठरवले. ठरवल्या प्रमाणे ६ मार्चला वृषालीनं जगदीशच्या जेवणात विष देऊन त्यानंतर गळा दाबून त्याची हत्या केली.

चोरीचा बनाव

पतीच्या हत्येचा आरोप आपल्यावर येऊ नये, यासाठी वृषालीने चोरीचा बनाव रचत नवऱ्याचा खून झाल्याचे सांगून पोलीस ठाण्यात तक्रार केली. पण जगदीशच्या शवविच्छेदन अहवालात त्याला विष देऊन त्याची हत्या केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी वृषालीला चौकशीसाठी बोलावले. चौकशी दरम्यान, तिला पोलीसी खाक्या दाखवताच तिने पतीच्या हत्येची कबुली दिली, अशी माहिती कल्याणचे सहाययक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी पत्रकारांना दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here