होय ! तुमचं वृत्तपत्र सुरक्षितच, १ एप्रिलपासून आपल्या सेवेत

Mumbai
corona- newspaper
होय ! एकदम सेफ
केंद्र व राज्य सरकारने १४ एप्रिल पर्यंत लागू केलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर काल २५ मार्च रोजी उद्योगमंत्री , सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत विक्रेते प्रतिनिधी व वृत्तपत्र प्रकाशकांचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली . केंद्र व राज्य सरकारने सुरू ठेवावयाच्या सेवा वर्गात प्रसार माध्यमाचा समावेश केल्यामुळे , महाराष्ट्रातील वृत्तपत्रे  1 एप्रिल 2020 पासून प्रसिध्द व वितरीत करण्याचा निर्णय सदर बैठकीत घेण्यात आला आहे.

नागरिकांना देशासह जगभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी टिव्ही आणि वृत्तपत्र हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. अशातच लोकांमध्ये एक अफवा पसरली होती की, वृत्तपत्रांमुळे करोना व्हायरस पसरण्याचा धोका आहे. परंतु, हा निव्वळ गैरसमज आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशननेदेखील ही बाब फेटाळून लावली आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO) ने सांगितल्यानुसार, एक अशी वस्तू जी अनेक ठिकाणी प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचते. म्हणजेच, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना ती वस्तू वेगवेगळ्या तापमानामधून, परिस्थितीतून प्रवास करते. त्यामुळे अशा वस्तूंमुळे करोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता अत्यंत कमी असते.

सुरक्षित आहे वृत्तपत्र बिनधास्त वाचा

अमेरिकेतील एका वैद्यकिय संस्थेने सांगितल्यानुसार, वृत्तपत्रामुळे करोना व्हायरसचा संसर्ग होत नाही. संस्थेने सांगितलं की, वृत्तपत्रामुळे करोनाचा व्हायरस पसरणे अशक्य आहे.

या बैठकीत निश्चित ठरवलेली कामे

वृत्तपत्रांचे 1 एप्रिल 2020 पासून प्रकाशन व वितरण पुन्हा सुरू करण्यात येईल,  प्रतींची मागणी विक्रेते आधीच्या दिवशी नोंदवतील, शिल्लक प्रती कंपनी कोणतीही सबब न सांगता परत घेतील, १४ एप्रिल पर्यंत बिल भरण्यास सवलत देणेबाबत कंपन्या सहानुभूतीने विचार करतील, डेपोवर गर्दी केली जाणार नाही अंक वेळेवर पोहोचविले जातील . ( पहाटे ३ ते ७ ) , वृत्तपत्रे निर्जंतुक केली जातील. विक्रेत्यांना हँड सॅनिटायझर्स , मास्क कंपन्या पुरवतील, विक्रेते व वितरण सहाय्यकांच्या रूग्णालय खर्चाची प्रतिपूर्ती केली जाईल . ( फक्त कोरोना ) ,सोसायट्या / संस्था / वाचकांना वृत्तपत्रे स्वीकारण्याची विनंती कंपन्या करतील, विक्रेते व वितरण सहाय्यकांना कंपन्या ओळखपत्रे उपलब्ध करून येतील . ( नावे विक्रेते देतील . ) हे इतिवृत्त सर्वानुमते मंजूर करण्यात आले.