घरमुंबईनिलेश राणे यांची पुन्हा टीवटीव...शिवसेनेवर पुन्हा प्रहार

निलेश राणे यांची पुन्हा टीवटीव…शिवसेनेवर पुन्हा प्रहार

Subscribe

जेडीयुचे प्रशांत किशोर यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर येऊन भेट घेतली. त्यासंदर्भात निलेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर जोरदार टिका करणाऱ्या निलेश राणे यांनी आता पुन्हा एकदा ट्विटरवरून शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनावाले सत्तेसाठी छातीवर अर्धे कमळ लावून फिरतील, असा टोला निलेश राणे यांनी ट्विटरवरून लगावला आहे. त्यामुळे आधी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या निलेश राणे यांनी आता प्रशांत किशोर यांच्या मातोश्री भेटीवरून शिवसेनेवर टोला लगावला आहे. नुकतीच जेडीयुचे प्रशांत किशोर यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर येऊन भेट घेतली. त्यासंदर्भात निलेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. निलेश राणे यांनी ट्विटवर प्रशांत किशोर आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो असून, ते राजीनामेही फाडून टाकायला सांगा, असाही टोला लगावला आहे.


हेही वाचा – निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना दिले ‘हे’ चॅलेंज

- Advertisement -

याआधी थेट बाळासाहेबांवर टीका 

दरम्यान निलेश राणे यांनी याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही टीका केली होती. आनंद दिघे यांची हत्या बाळासाहेबांनीच घडवून आणली असा सनसनाटी आरोप निलेश राणे यांनी केला होता. तसेच सोनू निगमचे बाळासाहेबांशी असलेले नाते सांगायला लावू नका,असेही ते म्हणाले होते.


हेही वाचा – डान्सबार सुरु; छोटा पेंग्विन खूश – निलेश राणे

- Advertisement -

शिवसेनेसोबत राहुल गांधीही लक्ष

तर निलेश राणे यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे.राहुल गांधी यांनी किमान वेतन देणार असल्याचे जाहीर केले होते.त्यावर किमान वेतन म्हणजे नेमके काय,असा खोचक सवाल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -