घरमुंबई...तर मी देखील संघ शाखेत जाईन - नारायण राणे

…तर मी देखील संघ शाखेत जाईन – नारायण राणे

Subscribe

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपमध्ये प्रवेश न देता थेट त्यांचे चिरंजीव नितेश राणे यांना भाजपने तिकीट देत भाजपमध्ये प्रवेश दिला. त्यामुळे नारायण राणे आणि निलेश राणे यांच्याआधी नितेश राणे भाजपवासी झाले. भाजपवासी झालेल्या नितेश राणे यांनी दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या. सोशल मीडियावर नितेश राणे यांचा संघाच्या कार्यक्रमात जमिनीवर बसलेला फोटो व्हायरल झाला होता. त्यावर आता नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

nitesh rane
नितेश राणे

काय म्हणाले नारायण राणे

संघाच्या कार्यक्रमाला जाणं यात चुकीच काय? संघात जाण चुकीचं नाही, मीही संघात जाईन, संघाच्या प्रमुखांना भेटेन, जायचंच तर मनापासून जायचं, असं म्हणत नारायण राणे यांनी नितेश राणेंच्या संघ कार्यक्रमातील बैठकीचे समर्थन केले आहे. पुढे ते म्हणाले की, माझी विचारधारा ही हिंदुत्ववादीच आहे. काँग्रेसमध्ये जाणं हा माझा नाईलाज होता. भारतीय जनता पक्षाची विचारधारा मी मान्य केली आहे आणि संघाची विचारधाराही मी मान्य करतो, असे म्हणत संघाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिन, असेही राणे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

नितेश राणेंच्या संघ परिवारातील कार्यक्रमाच्या फोटोची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली. अनेकांनी नितेश यांना ट्रोल करायला सुरुवात केली. या फोटोत नितेश राणे संघाच्या कार्यक्रमाला हजर असून गणवेश नसल्यामुळे वेगळ्याच रांगेत बसल्याचे पाहायला मिळत आहेत. नितेश राणेंच्या या संघबैठकीचे वडिल नारायण राणेंनी समर्थन केले आहे. तसेच, मीही संघाच्या कार्यक्रमाला जाईल, त्यात गैर काय, असेही स्पष्टीकरण राणेंनी दिले आहे.

हेही वाचा –

नितेश राणे संघाच्या कार्यक्रमात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -