घरमुंबईतर कॉट्रॅक्टरवर बुलडोजर चालवेन - नितीन गडकरी

तर कॉट्रॅक्टरवर बुलडोजर चालवेन – नितीन गडकरी

Subscribe

रस्त्यांची परिस्थिती वाईट असेल तर मी कॉट्रॅक्टरवर बुलडोजर चालवेन असं केंद्रिय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. नवी मुंबई आतरराष्ट्रीय विमानतळाच्या विरोधात कोर्टात सुरु असलेल्या याचिकेमुळे कामाला विलंब होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

रस्त्यांची परिस्थिती वाईट असेल तर मी कॉट्रॅक्टरवर बुलडोजर चालवेन असं केंद्रिय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. त्याचबरोबर हाती घेतलेल्या कामात हलगर्जीपणा चालणार नाही असेही ते म्हणाले आहेत. आज, शुक्रवारी लेखक तुहिन सिन्हा यांच्या ‘India Inspires’ या पुस्तकाच्या प्रकाशानावेळी ते बोलत होते. हे पुस्तक नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी नवी मुंबई आतरराष्ट्रीय विमानतळाच्या विरोधात कोर्टात सुरु असलेल्या याचिकेमुळे कामाला विलंब होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

नेमकं काय म्हणाले गडकरी?

नितीन गडकरी म्हणाले की, आम्ही आतापर्यंत किमान १० लाख कोटींची वर्क ऑर्डर दिली आहे आणि हे सांगताना मला गर्व आहे की, आतापर्यंत कामाची ऑर्डर घेण्यासाठी एकाही कॉट्रॅक्टरला दिल्ली ऑफिसमध्ये येण्याची गरज भासली नाही आणि हे मी अभिमानाने सांगू शकतो. पण एक आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक कॉट्रॅक्टरला खडसावून सांगितलं देखील आहे की, जर रस्त्याची कामं नीट झाली नाही तर तोच बुलडोजर तुमच्यावर फिरवेन. हे बोलण्यासाठी मला काहीही संकोच वाटत नाही, असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.

- Advertisement -

विमानतळासाठी अडथळे

यावेळी नवी मुंबई येथे होणाऱ्या विमातळावरही गडकरी यांनी प्रतिक्रीया दिली. गडकरी म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे फक्त रोड नाही तर जलमार्गालादेखील जोडण्यात येणार आहे. विमानतळावर जलमार्गाने प्रवास केल्यानंतर लोक फक्त २० मिनिटांत विमानतळावर पोहचू शकणार आहेत. पण यावर पर्यावरणतज्ज्ञांनी अथडळे निर्माण केले आहेत आणि याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. पण मी मुंबईत मंत्री असताना, अनेक प्रकल्पाच्या विरोधात कोर्टात १०० पेक्षा जास्त याचिका दाखल केल्या होत्या. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाशी तडजोड करणार नसल्याचंही गडकरी म्हणाले. या प्रकल्पातून पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही यासाठी आम्ही सर्वोत्तम उपाय करणार असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितले. पण दाखल झालेल्या याचिकेमुळे कामाला विलंब होत असल्याचंही ते म्हणाले.


हेही वाचा – भर कार्यक्रमात गडकरींना आली भोवळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -