घरमुंबईगडकरींना राऊत यांचा सल्ला; म्हणाले मोदींकडून घ्या 'हेल्थटीप्स'!

गडकरींना राऊत यांचा सल्ला; म्हणाले मोदींकडून घ्या ‘हेल्थटीप्स’!

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आरोग्यासंबंधी सल्ला दिला आहे. गडकरी यांनी हेल्थबाबत पंतप्रधानांकडून टिप्स घ्याव्यात, असे ते म्हणाले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आरोग्यासंबंधी सल्ला दिला आहे. नितीन गडकरी त्यांची प्रकृती लवकर सुधारावी. मात्र, गडकरी यांनी हेल्थबाबत पंतप्रधानांकडून टिप्स घ्याव्यात. पंतप्रधान जगभर फिरूनदेखील त्यांची तब्येत खराब होत नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे. अहमदनगरच्या राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी नितीन गडकरी आले होते. यावेळी त्यांनी भाषणही केले. मात्र कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरू असताना भोवळ आल्याने गडकरी कोसळले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या राज्यपालांनी गडकरींना सावरले. तसेच डॉक्टरांनी तातडीने गडकरी यांची तपासणी केली. त्यानंतर गडकरी यांना रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शिवसेनेसोबत भाजपा युतीसाठी आग्रही

मात्र त्यांच्या या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. गडकरींच्या प्रकृतीबाबत बोलताना, राऊत यांनी मोदींना टोला लगावला. तसेच गडकरींची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थनाही केली. तसेच राऊत यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेना स्वबळाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे राऊत यांनी सांगितले. शिवसेनेसोबत भाजपा युतीसाठी आग्रही आहे. परंतू, २०१४ साली भाजपाची युतीची इच्छा कुठे दबली होती?, २०१४ साली तोडलेली युती २०१९ साली का करावी वाटते, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस आणि उद्धव भेट ठाकरेंची भेट याचा युतीशी संबंध नाही. भाजपाचा कार्यक्रम आहे म्हणून जायचं नाही, ही शिवसेनीची संस्कृती नाही, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

वाचा : भर कार्यक्रमात गडकरींना आली भोवळ…

वाचा : साईंच्या दर्शनानंतर गडकरी नागपुरला होणार रवाना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -