घरमुंबईपालिकेच्या १२० दवाखान्यांमध्ये ‘आपली चिकित्सा’ नाहीच!

पालिकेच्या १२० दवाखान्यांमध्ये ‘आपली चिकित्सा’ नाहीच!

Subscribe

प्रसुती वगळता चार विशेष रुग्णालयांसह काही उपनगरीय रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये या योजनेचा लाभ दिला जात आहे. सध्या काही रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये आपली चिकित्सा अंतर्गत निदान चाचण्या करण्यात येत असून टप्प्याटप्प्याने उर्वरीत ठिकाणी सेवा सुरु करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या विशेष रुग्णालय तसेच प्रसुतीगृहांसह दवाखान्यांमध्येही रक्तासाहित इतर वैदयकीय निदान चाचण्या करण्यासाठी ‘आपली चिकित्सा’ योजना राबवण्यास मागील फेब्रुवारी महिन्यात मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्षात याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. परंतु आपली चिकित्सा अंतर्गत रुग्णांकडून प्रत्येक चाचणीसाठी अनुक्रमे ५० आणि १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्या तुलनेत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (एनयूएचएम) अंतर्गत मोफत वैद्यकीय सुविधा मिळणार असल्याने त्याची सुविधा २९ प्रसुतीगृह आणि महापालिकेच्या १२० दवाखान्यांमध्ये पुरवली जाणार आहे. त्यामुळे उर्वरीत विशेष रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये आणि काही दवाखान्यांमध्येच ‘आपली चिकित्सा’चा लाभ रुग्णांना दिला जाणार आहे. प्रसुती वगळता चार विशेष रुग्णालयांसह काही उपनगरीय रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये या योजनेचा लाभ दिला जात आहे. सध्या काही रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये आपली चिकित्सा अंतर्गत निदान चाचण्या करण्यात येत असून टप्प्याटप्प्याने उर्वरीत ठिकाणी सेवा सुरु करण्यात येणार आहे.

तपासण्यांच्या खर्चाचा भार महापालिकेवर

महापालिकेच्या १६ उपनगरीय रुग्णालयांपैकी राजावाडी रुग्णालय, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, वांद्र्यातील के. बी. भाभा रुग्णालय आणि गोरेगावमधील सिद्धार्थ रुग्णालय या चार रुग्णालयात तिन्ही पाळ्यांमध्ये प्रयोगशाळा सुरू आहेत. याठिकाणी मूलभूत तपासण्या होत असल्या तरी जटील तपासण्या होत नाहीत. शिवाय १२ रुग्णालयांमध्ये एक किंवा दोन पाळ्यांमध्ये प्रयोगशाळा सुरू आहेत. तिथेही जटील तपासण्या होत नाहीत. त्यामुळे यासह विशेष रुग्णालयांसह प्रसूतीगृह आणि दवाखान्यांमध्ये ‘आपली चिकित्सा’ अंतर्गत अद्ययावत विकृत चिकित्सा चाचणी नि:शुल्क देण्याचा निर्णय सर्वप्रथम प्रशासनाने घेतला होता. यासाठी महापालिकेने रुग्णांकडून मूलभूत नमुना प्रति चाचणीसाठी १०० रुपये शुल्क आणि अतिविशेष चाचणीसाठी २०० रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु स्थायी समितीने उपसूचनेद्वारे हे शुल्क अनुक्रमे ५० आणि १०० असे आकारण्याचा निर्णय घेतला. परंतु एवढे शुल्क रुग्णांना आकारले जात असले तरी महापालिका कंपनीला अनुक्रमे २२३ आणि ८९२ एवढे शुल्क प्रत्येक चाचणीसाठी मोजणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पालिकेची खर्चिक सुरक्षा; खासगी सुरक्षेवर ३.५ कोटींचा खर्च!

विशेष रुग्णालयांमध्ये ‘आपली चिकित्सा’

फेब्रुवारी महिन्यात ‘आपली चिकित्सा’ योजनेला मंजुरी देण्यात आल्यानंतरही लोकसभा आचारसंहितेमुळे प्रत्यक्षात याच्या अंमलबजावणीला विलंब झाला. आचारसंहिता उठल्यानंतर जून महिन्यापासून याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. सध्या विशेष रुग्णालयांमध्ये तसेच काही उपनगरीय रग्णालयांमध्ये ‘आपली चिकित्सा’ सुरु झाली आहे. तर २८ प्रसुतीगृहांमध्ये ही योजना सुरुच करण्यात आली नसून १२० दवाखाने वगळता उर्वरीत दवाखान्यांमध्ये ‘आपली चिकित्सा’ सुरु करण्यात येत आहे. त्यातील १० ते ११ दवाखान्यांमध्ये ‘आपली चिकित्सा’ योजना सुरु करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

मूलभूत नमुना चाचण्या : १०१
प्रति चाचणी शुल्क : ५० रुपये

- Advertisement -

अतिविशेष नमुना चाचण्या : ३८
प्रति चाचणी शुल्क : १०० रुपये

शहर

प्रयोगशाळा : थायरॉकेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड
चार वर्षांचे कंत्राट : २३.१८ कोटी रुपये
विशेष रुग्णालये : ०५
दवाखाने : ७०
प्रसूतीगृहे : ०५

पूर्व उपनगर

प्रयोगशाळा : मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लिमिटेड
चार वर्षांचे कंत्राट : २६.८६ कोटी रुपये
उपनगरीय रुग्णालये : ०८
दवाखाने : ४७
प्रसूतीगृहे : १०

पश्चिम उपनगर

प्रयोगशाळा : थायरॉकेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड
चार वर्षांचे कंत्राट : २९.१४ कोटी रुपये
उपनगरीय रुग्णालये : ०८
दवाखाने : ५८
प्रसूतीगृहे : १३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -