‘नो बिल, नो पेमेंट’ मुळे ५ लाख रेल्वे प्रवाशांना मिळाली बिले

Mumbai
No bill No Payment

रेल्वे स्थानकांवर असलेल्या खाद्यपदार्थ आणि अन्य वस्तूच्या स्टॉल्सविरोधात जादा दर आकारणे, दर नियमित न ठेवणे यांसह अन्य तक्रारी मोठ्या प्रमाणात रेल्वे विभागाला आल्या होत्या. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने ‘नो बिल, नो पेमेंट’ संकल्पना राबवली. त्यानुसार आतापर्यंत स्टॉलधारकांकडून खाद्यपदार्थ खरेदी करून प्रवाशांना एकूण ५ लाख ८० हजार बिले देण्यात आली. विषेश म्हणजे ‘नो बिल, नो पेमेंट’ उपक्रमाच्या अंतर्गत पहिल्याच दिवशी ५० हजार बिले प्रवाशांना देण्याचा विक्रम पश्चिम रेल्वेने केला आहे.

रेल्वेच्या मुंबई विभागात 242 स्टॉल्स असून या स्टॉल्सविरोधात एखाद्या वस्तूकरता जादा दर आकारणे, दर नियमित न ठेवणे यासह अन्य तक्रारी येत होत्या. रेल्वे मंत्रालयाने नुकतेच स्टॉलवर ई-बिल देणारी पीओएस मशिन (पॉईंट ऑफ सेल) बसवण्याचे आदेश दिले. त्यानंतर 242 पैकी 232 स्टॉलमध्ये पिओएस मशीन बसवण्यात आल्या. यामध्ये ‘नो बिल, नो पेमेंट’च्या कठोर अंमलबजावणीनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील स्टॉलधारकांकडून वस्तूच्या खरेदीनंतर प्रवाशांना एकूण ५ लाख ८० हजार बिले देण्यात आली आहेत.‘नो बिल, नो पेमेंट’ उपक्रमाच्या अंतर्गत पहिल्याच दिवशी ५० हजार बिले प्रवाशांना देण्याचा विक्रम पश्चिम रेल्वेने केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here