घरमुंबईदोन तासांच्या बैठकीनंतरही काँग्रेसचा निर्णय नाहीच

दोन तासांच्या बैठकीनंतरही काँग्रेसचा निर्णय नाहीच

Subscribe

आज पुन्हा बैठक होणार, शिवसेनेचे टेन्शन वाढले

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला सत्ता संघर्षचा घोळ अद्याप कायम राहिला असून शिवसेनेने सत्ता स्थापनाचा दावा केला असला तरी अद्याप काँग्रेसचा निर्णय न झाल्याने महाराष्ट्रात नवा राजकीय घोळ सुरु झाला आहे. दरम्यान, सोमवारी सकाळपासून दोनदावेळा बैठका घेवूनही अंतिम निर्णय झालेला नसल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठी याप्रकरणी मंगळवारी पुन्हा एकदा बैठक घेणार असून राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका निकाल जाहीर झाल्यानंतर गेल्या १७ दिवसांपासून सुरु असलेला सत्तासंघर्ष सोमवारी संपुष्टात येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र सोमवारीही हा प्रश्न निकाली न निघाल्याने अद्याप महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच कायम असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, हा प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसतर्फे सोमवारी दिवसभरात दोन बैठका घेण्यात आल्या होत्या. या बैठकीत कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. या बैठकीत काँग्रेसला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,अशोक चव्हाण,माणिकराव ठाकरे, सध्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राजीव सातव, रजनी पाटील हे महाराष्ट्राचे सहा पक्षनेते उपस्थित होते.

- Advertisement -

दरम्यान, शिवसेनेला पाठींबा देण्यासाठी मुंबईतून शरद पवार यांनी देखील काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा देखील केली. मात्र त्यानंतरही याबाबत अंतिम निर्णय झाला नाही. सोमवारी वांद्रे येथील एका पंचतारांकीत हॅाटेलमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत ही उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात फोनवरुन चर्चा करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही याप्रकरणी निर्णय न झाल्याने शिवसेना अद्याप पाठींब्याच्या पत्रासाठी डोळे लावून बसले आहे.

दोन गट कायमच
राज्यात शिवसेनेला पाठींब्या देण्यावरुन राज्यातील काँग्रेसमध्ये अद्याप एकमत झालेला नाही. सोमवारी ही पाठींब्याच्या दिवशी ही शिवसेनेला पाठींब्या देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट कायम असल्याचे दिसून आले. ज्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत विरोधात लढलो आहोत. त्यांची विचारधरणा देखील वेगळी असल्याने पाठींबा देवू नये. अशी मागणी काँग्रेसच्या एका गटाकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनाला पाठींबा देण्याची गरज अनेक आमदारांनी बोलून दाखविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -