घरमुंबईरात्री ९ ते पहाटे ५ संचारबंदी

रात्री ९ ते पहाटे ५ संचारबंदी

Subscribe

मुंबईत पहाटे ५ ते रात्री ९ -विनाकारण फिरण्यास बंदी,मुंबई पोलिसांचाही उडाला आहे गोंधळ

लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी सोशल डिस्टनिंगचा फज्जा उडत असल्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी (कर्फ्यू)लागू करण्यात आली आहे. तर पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत अत्यावश्यक कामासाठीच राहत्या घरापासून दोन किलोमीटरपर्यंत प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र विनाकारण फिरणार्‍यांना बंदी घालण्यात आली असून एकापेक्षा अधिक जण एकत्रित आल्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. पण कामावर जाणार्‍या लोकांनी घरातून बाहेर पडायचे की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने मुंबई पोलिसांचाही गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे.

1 जुलैला रात्री बारा ते 15 जुलैपर्यंत बारा वाजेपर्यंत हा संचारबंदी आणि जमावबंदीचा आदेश लागू राहणार आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आणि कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी पुन्हा शहरात जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने लॉकडाऊनचे काही नियम शिथील केले होते, त्याचा मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला होता. विनाकारण मुंबईकर बाहेर पडत होते, शासनासह पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात होते. मास्क न लावणे, सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणे तसेच गर्दी करणे आदीचे उल्लघंन होत होते, त्यामुळे गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांत दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे अखेर पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी बुधवारी संचारबंदी आणि जमावबंदीच्या आदेशाची नोटीस काढली.

- Advertisement -

पंधरा जुलैपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. पहाटे पाच ते रात्री नऊ वाजता मुंबईकरांना अत्यावश्यक कामासाठी केवळ दोन किलोमीटरपर्यंत जाता येईल, अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना त्यांच्या कामासाठी मुभा देण्यात आली आहे. रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत नेहमीप्रमाणे कर्फ्यू असणार आहे, मात्र त्यातून अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आली आहे. एकापेक्षा पाच व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. तसे दिसल्यास त्यांच्यावर 144 भादवी कलमांतर्गत योग्य ती कारवाई केली जाणार आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे, त्यामुळे मुंबईकरांनी पोलिसांना सहकार्य करावे, पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडू नका तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -