घरताज्या घडामोडीNight Curfew : मुंबईतील रात्रीचा कर्फ्यू उठवला!

Night Curfew : मुंबईतील रात्रीचा कर्फ्यू उठवला!

Subscribe

मुंबईतील रात्रीचा कर्फ्यू उठवण्यात आला आहे. रात्रीच्या कर्फ्यूचा कालावधी वाढवण्यासंदर्भात राज्य सरकारकडून कुठलीही सूचना न आल्याने, मुंबई पोलिसांनी मुंबईतील रात्रीचा कर्फ्यू न वाढवण्याचा निर्णय बुधवारी घेतला आहे. या अगोदर रात्री ११ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत नाईट कर्फ्यू होता. या कर्फ्यूची ५ जानेवारीपर्यंत मुदत होती. त्यामुळे आता मुंबईत रात्रीचा कर्फ्यू नसणार आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली होती. या बैठकीत महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

ख्रिसमस व नववर्ष सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महापालिका क्षेत्रात रात्रीच्या कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती. हा कर्फ्यू रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत होता. याची मुदत ५ जानेवारी पर्यंतच होती. ही मुदत संपलेली असल्याने आणि राज्य सरकारकडून कर्फ्यूचा कालावधी वाढवण्याबद्दल कुठलीही सूचना आली नसल्याने, मुंबई पोलिसांनी मुंबईमधील नाईट कर्फ्यूचा कालावधी न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ५ जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला होता. या कर्फ्यूची मुदत आता संपली असून तो पुढे वाढवण्यात येणार नाही. त्यामुळे आज रात्रीपासून मुंबईतला नाईट कर्फ्यू उठवण्यात आला आहे.

यश चैतन्य, पोलीस उपायुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -