घरCORONA UPDATEलॉकडाऊननंतरही लोकल प्रवास नकोच!

लॉकडाऊननंतरही लोकल प्रवास नकोच!

Subscribe

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही जवळपास ६१ टक्के प्रवाशांना मुंबई लोकलने किमान एक ते दोन महिने प्रवास करायचा नाही.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही जवळपास ६१ टक्के प्रवाशांना मुंबई लोकलने किमान एक ते दोन महिने प्रवास करायचा नाही. तर ३९ टक्के प्रवाशांनी या प्रवासासाठी होकार दर्शवला आहे. एम इंडिकेटर या मुंबई लोकल प्रवाशांमधील प्रसिद्ध अशा एप्लिकेशनमार्फत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे निकाल समोर आले आहेत. जवळपास ५० हजारांहून अधिक प्रवाशांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. लॉकडाऊननंतर लोकल प्रवासासाठी प्रवाशांची मानसिकता काय आहे, हे जाणून घेणे सर्वेक्षणाचा उद्देश होता.

एम इंडिकेटर हे मुंबई लोकलचे वेळापत्रक पाहण्यासाठीचे सर्वात लोकप्रिय असे एप्लिकेशन आहे. या अँपमार्फत मुंबईतील जवळपास ५० हजार युजर्सचे सर्वेक्षणात करण्यात आले होते. या सर्वेक्षणादरम्यान युजर्सने लोकल प्रवासाबाबतचे आपले मत व्यक्त केले आहे. या सर्वेक्षणात युजर्सना लोकल प्रवास करण्यासाठी कधी आवडेल असा प्रश्न करण्यात आला होता. तर त्यासाठीचे दोन पर्यायही देण्यात आले होते. पहिल्या पर्यायाअंतर्गत लॉकडाऊन संपल्यानंतर लगेचचा प्रवास करण्याचा पर्याय होता. या पर्यायासाठी जवळपास ३९ टक्के युजर्सने आपली सहमती दर्शवली. तर दुसऱ्या पर्यायाअंतर्गत दोन ते तीन महिन्यांचा अवधी हा पर्याय देण्यात आला होता. दुसऱ्या पर्यायाअंतर्गत ६१ टक्के युजर्सने येत्या दोन ते तीन महिने प्रवास करायला नको असे मत मांडले आहे.

- Advertisement -

मुळातच लॉकडाऊननंतर लोकल प्रवासाची मानसिकता जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणातून करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया एम इंडिकेटरचे संस्थापक सचिन टेके यांनी दिली आहे. मुंबईत सध्या बहुतांश प्रवासी हे लोकल वेळापत्रकासाठी एम इंडिकेटरचा वापर करतात. एम इंडिकेटर हे अँप गुगल प्ले स्टोअरवर १ कोटी युजर्सने डाऊनलोड केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -