घरमुंबईकामा हॉस्पिटलच्या कामगारांचं 'विनागणवेश रुग्णसेवा' आंदोलन!

कामा हॉस्पिटलच्या कामगारांचं ‘विनागणवेश रुग्णसेवा’ आंदोलन!

Subscribe

कामा हॉस्पिटलमधल्या बदली कर्मचाऱ्यांना गेल्या ४ वर्षांपासून गणवेशच दिले नसल्याची बाब समोर आली आहे. त्याचा निषेध म्हणून या कर्मचाऱ्यांनी विनागणवेश रुग्णसेवा आंदोलन सुरू केलं आहे.

कामा हॉस्पिटलमध्ये २०१५ साली शासन निर्णयाप्रमाणे ४७ बदली कामगारांना कामावर कायम केलं. पण, हे कामगार गेली चार वर्षे गणवेशाविना काम करत आहेत. वारंवार मागणी करून देखील स्थानिक हॉस्पिटल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे. सध्या हे कामगार रंगीत कपडे घालून कामाला येत आहेत. प्रशासनाने कपडे न दिल्यास सामूहिक रजा आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे कामगार संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

इतर हॉस्पिटलमध्ये दिले गणवेश

राज्य सरकारच्या इतर हॉस्पिटलमध्ये जे. जे. जीटी आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये बदली कामगारांना कायम सेवेत घेण्यात आले आहे. त्याचवेळी कामा हॉस्पिटलच्या कामगारांनाही कायम करण्यात आले आहे. इतर हॉस्पिटलमधील
कर्मचाऱ्यांना शिलाई भत्ता, धुलाई भत्ता यासोबत गणवेशाचे कापड देण्यात आले. कामा हॉस्पिटलमधील
कामगार मात्र गणवेशापासून अद्याप वंचित असल्याचे कामगार सांगतात.

- Advertisement -

हेही वाचा – कामा हॉस्पिटलच्या ‘त्या’ कटू आठवणी

विनागणवेश रुग्णसेवा आंदोलन

यावर महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभाग बदली कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले की, ‘या कामगारांसाठी आजवर प्रशासनाकडे वारंवार पत्र व्यवहार करूनही स्थानिक प्रशासन कामगारांच्या गणवेशाच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष करत आहे. आठ दिवसात कार्यवाही न केल्यास गणवेश न घालताच रूग्ण सेवा आंदोलन करण्यात येईल’, असा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे ५ जुलैपासून विनागणवेश रुग्णसेवा सुरू असल्याचे संघटनेचे सचिव कृष्णा क्षीरसागर यांनी सांगितले.

हा कामगारांवर अन्याय असून कामगारांना गणवेशाचे कापड मिळण्यासाठी यापूर्वी २९ मे २०१८, १२ जुलै २०१८, २९ ऑक्टोबर २०१८ आणि ५ जानेवारी २०१९ असे चार वेळा निवेदन पत्र देण्यात आले आहे. ही मागणी मान्य न झाल्यास १२ आणि १३ जुलै या दोन दिवशी सामूहिक रजा आंदोलन करण्यात येईल.

सत्यवान सावंत, अध्यक्ष, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभाग बदली कर्मचारी संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -