घरमुंबईकोट्यावधींचे कोविड कोच उभे राहिले, कुणी नाही वापरले

कोट्यावधींचे कोविड कोच उभे राहिले, कुणी नाही वापरले

Subscribe
भारताने रेल्वे कोचेसचे रूपांतर कोविड सुविधेसाठी केल्याने जगभरातून भारताचे कौतुक झाले होते. पण कोट्यावधी रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या कोचेसचा काहीही उपयोग झाला नाही असे निदर्शनास आले आहे. भारतीय रेल्वेने तयार केलेल्या ९०० कोचेसमध्ये एकही रूग्ण दाखल करण्यात आला नाही अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे कोच कोविड केअर सुविधेसाठी तयार करण्याचा ६ कोटी रुपयांचा खर्च वाया गेला असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.
मार्च महिन्यात रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार मध्य रेल्वेने आणि पश्चिम रेल्वेने रेल्वे डब्यांचे रूपांतरण करण्याचे काम हाती घेतले. मध्य रेल्वेने ४८२ कोचेसचे रूपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यासाठी ३ कोटी ८० लाख रुपये खर्च केले. तर पश्चिम रेल्वेने ४१० कोचेस साठी २ कोटी रूपये खर्च केले. महाराष्ट्र सरकारला कोविड उपचारासाठी बॕकअप म्हणून ही कोविड केअरची सुविधा निर्माण करण्यात आली होती.
  1. ठाण्याचे रहिवासी रवींद्र भागवत यांनी एका माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मागवली होती. एक कोच कोविड केअरसाठी रूपांतरीत करताना ८५ हजार रूपयांचा खर्च येतो असे माहिती अधिकारात उघड झाले आहे. तर पुन्हा नियमित रेल्वेच्या कोचमध्ये रूपांतरीत करण्यासाठीही खर्च येणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. रेल्वेने हा खर्च वायफळ नसल्याचे सांगत आपण केलेल्या कामाची पाठराखण केली आहे. राज्य सरकारचा कॉन्टिजेन्सी प्लॕन म्हणून या कोविड सुविधेचा उभारणी करण्यात आली होती. देशभरात जवळपास ५ हजार कोविड केअर कोचेसची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये ८० हजार बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार या तीन राज्यातच कोचेसचा वापर करण्यात आला. उपचारानंतर रूग्णांना डिश्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -