घरमुंबईनॉन डायबिटीक महिलेने दिला; ५.३ किलोच्या वजनाच्या बाळाला जन्म

नॉन डायबिटीक महिलेने दिला; ५.३ किलोच्या वजनाच्या बाळाला जन्म

Subscribe

कामा हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एका महिलेने ५.३ किलो ग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे डायबिटीस नसलेल्या महिलेने इतक्या जास्त वजनाच्या बाळाला जन्म दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुंबईतील स्त्रियांसाठी स्पेशल असलेल्या कामा हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एका महिलेने ५.३ किलो ग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म दिला आहे. कामा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी या महिलेची यशस्वी प्रसूती केली आहे. साधारणपणे डायबिटीस असलेल्या महिलांना अधिक वजनाची बाळं होतात. पण, कुलाब्यात राहणाऱ्या संजीवनी गावडे (बदललेले नाव) या डायबिटीस नसलेल्या महिलेने ५ किलो वजनाच्या बाळाला जन्म देणे, हे विशेष असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

शस्त्रक्रिया करून महिलेची प्रसूती

साधारणपणे एका नवजात बाळाचं वजन सरासरी अडीच किंवा तीन किलो एवढं असतं. पण, कुलाब्यातील आंबेडकर नगर येथील २८ वर्षीय संजीवनी गावडे या महिलेची सर्जरी करुन यशस्वी प्रसूती करण्यात आली आहे. संजीवनी गावडे यांनी २८ सप्टेंबर या दिवशी ५. ३ किलो वजनाच्या मुलीला जन्म दिला आहे.

- Advertisement -

बाळाला देखरेखीखाली ठेवण्यात आल आहे

याविषयी अधिक माहिती देताना कामा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजश्री कटके यांनी सांगितलं की, “कुलाब्यात राहणारी ही महिला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. बाळाचं वजन जास्त असल्याकारणाने त्याच दिवशी तिची शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली. सध्या या बाळाला एनआयसीयूमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. या आधी ५ किलो वजनाचं बाळ रुग्णालयात जन्माला आलं होतं. तसेच ४ किलो वजन असलेलं बाळही जन्माला आलं होतं. मात्र त्या केसेसमध्ये माता डायबिटीक होत्या. परंतू ही महिला नॉन डायबिटीक असून तिची यशस्वी प्रसूती करण्यात आली आहे.”

२४ नोव्हेंबर २०११ मध्ये रुग्णालयात ४.५ किलो वजनाचं बाळ जन्मलं होतं. त्यानंतर २ मार्च २०१३ मध्ये कामामध्ये मुंबईतील सर्वात जास्त म्हणजे ५ किलो वजनाचं बाळ जन्माला आलं होतं आणि आता २८ सप्टेंबर या दिवशी ५. ३६ किलो ग्रॅम वजनाचं बाळ जन्माला आलं आहे.

- Advertisement -

बाळांची भूक कमी-जास्त होते

तसंच, या महिलेचा गर्भधारणेदरम्यान असलेला चांगला आहार यामुळे या महिलेने ५.३६ किलो वजनाच्या मुलीला जन्म दिला आहे. अशा बाळांना एनआयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवलं जातं. कारण, या बाळांची भूक कमी-जास्त होत असते. या बाळांना २ ते ३ तासांनी स्तनपान करणं गरजेचं असतं. त्यात त्यांचं शूगरचं प्रमाणही कमी-जास्त होतं. हे बाळ सुदृढ आहे. बाळाचं वजन जास्त असल्यास प्रसूती करताना मातेला अतिरक्तस्त्राव होऊ शकतो. शिवाय, या केसमध्येही महिला दुसऱ्यांदा माता झाली आहे. याआधी तिचं सिझेरियन करण्यात आलं होतं. त्यामुळे तिला आधी टाके घालण्यात आले होते. बाळाचं वजन जास्त असल्याकारणाने ते टाके देखील तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांनी अशा वेळेस काळजी घेणं गरजेचं आहे, असं आवाहनही डॉ. कटके यांनी केलं आहे.

जगात १९५५ साली इटलीमध्ये ९ किलो वजन असलेलं बाळ जन्माला आलं होतं. तसंच, २०१० मध्ये ठाणे शहरात ५.९५ किलो वजन असलेल्या बाळाला सुखरुप जन्म देण्यात आला होता.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -