घरमुंबईपॉलिटेक्निकच्या प्रवेश फेरीत विनाअनुदानित संस्था

पॉलिटेक्निकच्या प्रवेश फेरीत विनाअनुदानित संस्था

Subscribe

राज्यातील पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणार्‍या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पॉलिटेक्निकच्या पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या  अतिरिक्त फेर्‍यांमध्ये आता विनाअनुदानित संस्थांचाही समावेश करण्यात येणार आहे.

राज्यातील पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणार्‍या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पॉलिटेक्निकच्या पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या  अतिरिक्त फेर्‍यांमध्ये आता विनाअनुदानित संस्थांचाही समावेश करण्यात येणार आहे. यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे हा निर्णय घेण्यात आला असून आतापर्यंतच्या अतिरिक्त फेर्‍यांमध्ये पहिल्यांदच विनाअनुदानित संस्थांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यभरातील पॉलिटेक्निक प्रवेशाच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याची  माहिती समोर आली आहे. आतापर्यंत झालेल्या प्रवेशानंतर सुमारे ५० हजार जागा रिक्त राहिल्या असून यंदा एकूण १ लाख २५ हजार जागा उपलब्ध आहेत. त्यानुसार नियमानुसार रिक्त जागांच्या प्रवेशासाठी अतिरिक्त फेर्‍या घेण्यात येणार असून त्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यासाठी वेळापत्रक जाहीर केले असून रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर तर शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम देता येणार आहेत. 27 ऑगस्ट रोजी प्रोव्हिजनल लिस्ट जाहीर केली जाणार आहे. 29 ते 30 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. 31 ऑगस्ट अखेर सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन अपलोड करण्याची डेडलाइन देण्यात आली आहे.

- Advertisement -

उच्च न्यायालयाच्या रिट याचिकेने दिलेल्या निर्णयानुसार यंदा प्रथमच अतिरिक्त होणार्‍या प्रवेश फेरीत विनाअनुदानित संस्थांचाही सहभाग होत आहे. या फेरीत पहिल्यांदाच विनाअनुदानित संस्थाचा सहभाग असल्याने विनाअनुदानित संस्थांतही जागा भरल्या जाणार आहेत.

 

- Advertisement -

सरकारी व खासगी महाविद्यालयांचीही संधी एकत्र

या फेरीत सहभागी होण्यासाठी विनाअनुदानित संस्थांना दोन दिवसाची मुदत देण्यात आली होती. ज्या संस्थांनी या फेरीत सहभागी होण्याची स्विकृती दिली आहे. अशा संस्थांच्या प्रथम वर्ष पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तिसर्‍या फेरीनंतर शिल्लक राहिलेल्या रिक्त जागा आपोआप अतिरिक्त फेरीसाठी घेतल्या जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -