करोनाबाधिताच्या उपचारात हलगर्जीपणा, नेरूळच्या हॉस्पिटलला दिली पालिकेने नोटीस

नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने डी. वाय. पाटील हॉस्पिटलला नोटीस बजावली आहे.

Navi Mumbai
corona-virus
भारतात करोनाग्रस्तांची संख्या ८३४, तर १९ जणांचा मृत्यू

नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने डी. वाय. पाटील हॉस्पिटलला नोटीस बजावली आहे. हॉस्पिटलवर गुन्हा दाखल का करू नये, असा जाब पालिका प्रशासनाने विचारला आहे. वाशी येथील महापालिका रुग्णालयात या महिलेचा मृत्यू झाला होता.

मृत्यू पावलेली महिला ही गोवंडी, मुंबई येथील निवासी होती. ती सुरुवातीला मुंबईच्या रुग्णालयात दाखल होती. त्यानंतर नेरूळच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिची प्रकृती गंभीर झाल्यानंर तिला २४ मार्च २०२० रोजी नवी मुंबई महानगरपालिका वाशी रुग्णालयात हलवण्यात आले. त्या ठिकाणी तिच्यावर पूर्ण सुरक्षितता बाळगून उपचार करण्यात येत होते. त्यावेळी तातडीने रूग्णाचे सॅम्पल घेऊन कस्तुरबा रूग्णालयात पाठवण्यात आले होते. ही रूग्ण नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात मृत्यू होण्यापूर्वी फक्त चार तास होती. मृत्यूनंतर आलेला या महिलेचा करोनो तपासणी अहवाल पॉझिटिव्ह होता.

नेरुळ येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये ही महिला उपचार घेत होती. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने महिलेचे करोना तपासणीसाठी नमुने घेतले नाहीत किंवा रुग्णालयात अलगीकरणाची सोयदेखील केली नाही. परंतू महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने बेजाबदारपणे तिला पालिका रुग्णालयात पाठवण्यात आले. खासगी रुग्णालयाच्या अशा बेजबाबदारपणामुळे प्रशासनाने गंभीर दखल घेत कारवाईचा बडगा उचलला आहे. लवकरच हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याचे संकेत पालिका प्रशासनाने नोटिसीद्वारे दिले आहेत.

हेही वाचा –

CoronaVirus : राज्यपाल, बच्चू कडू, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते १ महिन्याचे वेतन देणार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here