घरमुंबईयशवंत देव यांच्या घराबाहेर नोटीस

यशवंत देव यांच्या घराबाहेर नोटीस

Subscribe

ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले होते. मात्र त्यांच्या निधनानंतर लगेचच घरमालकाने घर खाली करण्यासंदर्भात एक नोटीस घराबाहेर लावली आहे.

लोकांमध्ये माणूसकी उरली नसल्याचा याचा अनुभव पुन्हा एकदा आला आहे. मंगळवार, ३० ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले होते. गेली ७५ वर्ष ते दादरमधील शिवाजी पार्क येथील वंदन सोसायटीत वास्तव्यास होते. मात्र त्यांच्या निधनानंतर लगेचच घरमालकाने घर खाली करण्यासंदर्भात एक नोटीस घराबाहेर लावली आहे. ज्या घरात राहून अनेक गाण्यांना संगीतबद्ध केले. ज्या घराने अनेक गायक घडवले, अशा घरातून यशंवत देव गेल्यानंतर लगेचच मालकाने घाराबाहेर नोटीस लावणं हे माणूसकीला शोभणार आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

३ दिवसाच्या आत घर खाली करा

बुधवारी यशवंत देव यांच्या अस्थी विसर्जनासाठी यशंवत देव यांचे पुतणे ज्ञानेश देव हे वंदन सोसायटीत आले. सोसायटीत येताच त्यांना घराबाहेर एक नोटीस लावलेली दिसली. घर खाली करण्यासंदर्भात ही नोटीस होती. घरमालक चौधरी यांनी ३ दिवसांच्या आत घर खाली करावं, असं या नोटीसमध्ये लिहीलं होतं. ही नोटीस बघून ज्ञानेश यांना धक्काच बसला. नोटीसी संदर्भात कोणतीच पूर्वसूचना न दिल्याचे ज्ञानेश यांनी सांगितले. त्यांच्या निधनानंतर लगेचच घर खाली करण्यासाठीची लावलेली नोटीस ही कितपत योग्य आहे, असा सवाल इतर रहिवासी उपस्थित करत आहेत.

- Advertisement -

नोटीसी संदर्भात प्रतिक्रिया नाही 

१९६० ला दत्तात्रय चौधरी यांनी शिवाजी पार्क परिसरातील वंदन ही इमारत विकत घेतली. दत्तात्रय यांना चार मुलं होती. त्यातील दिलीप यांच्या मालकीच्या घरात य़शवंत देव राहत होते. मात्र या नोटीसी संदर्भात चौधरी कुटुंबाकडून कोणतीच प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -