घरमुंबईपालघरनंतर आता शिवसेनेला भिवंडी मतदारसंघ हवा!

पालघरनंतर आता शिवसेनेला भिवंडी मतदारसंघ हवा!

Subscribe

भिवंडीत शिवसेना भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत , पदाधिकार्‍यांची पार पडली बैठक

कल्याण : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपची युती झाली असली तरी सुध्दा शिवसेना भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून येत असल्याचेच दिसून येत आहे. पालघर लोकसभा मतदार संघ भाजपने शिवसेनेसाठी सोडल्यानंतर आता शिवसेनेने भिवंडी लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे. लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांंची एक बैठक दोन दिवसांपूर्वी भिवंडीत पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेला हा मतदार संघ न सोडल्यास भाजपला आव्हान देण्याची भूमिका शिवसेनेने घेतल्याचे शिवसेनेतील एका पदाधिकार्‍याने आपलं महानगरशी बोलताना सांगितले. त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदार संघावरून शिवसेना भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेच्या काही अटी मान्य करीत भाजप आणि शिवसेना युतीची घोषणा झाली. भाजपच्या ताब्यात असलेला पालघर लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेला सोडण्यात यावा, ही त्यापैकीच एक अट होती. ही अट भाजपने बिनशर्त मान्य केली आहे. जिल्ह्यात कल्याण, ठाणे, भिवंडी आणि पालघर हे चार लोकसभा मतदार संघ आहेत. मात्र शिवसेनेच्या वाटणीत कल्याण, ठाणे आणि पालघर हे तीन मतदार संघ येणार आहेत. पालघरनंतर आता शिवसेनेने भिवंडी लोकसभा मतदार संघावर डोळा ठेवला आहे. भिवंडीतून भाजपचे खासदार कपिल पाटील हे निवडून आले आहेत. भिवंडी लोकसभा मतदार संघात शिवसेनेची ताकद अधिक प्रमाणात असल्याने भाजपने हा मतदार संघ शिवसेनेला सोडावा अशी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची मागणी आहे.

- Advertisement -

त्यासाठी भिवंडी शिवसेना शहर शाखेत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, माजी आमदार रूपेश पाटील, सुरेश (बाळ्या मामा), शिवसेनेचे बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे, कल्याणचे शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, कल्याण विधानसभाप्रमुख अरविंद मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते. भिवंडी लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे वर्चस्व आहे. इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्यामुळे भिवंडी शिवसेनेसाठी सोडण्यात यावे असा आग्रह या बैठकीत करण्यात आला. त्यामुळे शिवसेनेची ही मागणी वरिष्ठ पातळीवर मान्य केली जाते का याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

शिवसेनेचा दावा का ?
भिवंडी लोकसभा मतदार संघात कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड, वाडा तालुक्याचा परिसर येतो. शहरी व ग्रामीण असा दोन्ही परिसराचा या मतदार संघात समावेश आहे. कल्याण पश्चिमेचा भाग या मतदार संघात येतो, येथून 38 पैकी 22 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. मुरबाड, शहापूर पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता आहे. भिवंडी पूर्व व ग्रामीणमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत तर बदलूपरमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. या मुद्द्यावरच शिवसेनेने हा दावा केला आहे.

- Advertisement -

भिवंडी लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे वर्चस्व असल्याने शिवसेना या मतदार संघावर दावा करणार आहे. शिवसेनेच्या पदाधिकांची बैठक पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. भिवंडी शिवसेनेला सोडण्यात यावे यासाठी सर्वच पदाधिकारी आग्रही होते.
-अरविंद मोरे, कल्याण विधानसभा प्रमुख शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -