घरमुंबईअंगणवाडी सेविका सांभाळणार मतदारांची मुले

अंगणवाडी सेविका सांभाळणार मतदारांची मुले

Subscribe

मतदानाच्या दिवशी मतदारांच्या लहान मुलांना सांभाळण्याचे काम अंगणवाडी सेविका तसेच मदतनीसांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मतदान केंद्रावरील कामाला देखील जुंपण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांच्या लहान मुलांना सांभाळण्याचे काम अंगणवाडी सेविका तसेच मदतनीसांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, या निर्णयाला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने विरोध केला असून संघाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मार्च महिन्यापासून अंणवाडीसेविका आणि कर्मचाऱ्यांना मानधनही देण्यात आले नाही. त्यात आता हा निर्णय घेतल्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. यापूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मतदानाचे काम कधीच लावले नव्हते. पण, यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मतदारांच्या लहान मुलांना सांभाळण्याचे काम देण्यात आले आहे.

या कामाला आम्ही विरोध केला आहे. सध्या राज्यातील कमाल तापमान ४० ते ४५ अंश सेल्सिअसच्या घरात आहे. त्यात लहान मुलांना कोणता पालक घेऊन मतदान केंद्रावर येणार हा देखील प्रश्न आहे. तसेच, जे पालक आपल्या बाळाला सोबत आणतील त्या बाळांसाठी पाळणाघर उघडणार आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. यावर दोन सुनावण्या झाल्या आहेत. मंगळवारी ही सुनावणी आहे.
– राजेश सिंह, सचिव, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ

- Advertisement -

सेविका मतदान केंद्रांवर पोलिंग ऑफीसर

मतदान केंद्रांवर तात्पुरते पाळणाघर उभारण्यात आले असून त्या ठिकाणी लहान मुलांना ठेवण्यात येणार आहे. या मुलांची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांना मतदान केंद्रांवर पोलिंग ऑफीसर म्हणून नेमण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -