घरमुंबईआरपीएफ जवानांच्या गणवेशात आता कॅमेरा

आरपीएफ जवानांच्या गणवेशात आता कॅमेरा

Subscribe

रेल्वे प्रवासा दरम्यान रेल्वे पोलीस आणि प्रवाशांमध्ये अनेकवेळा बाचाबाची होते तर अनेकदा या वादाचे रुपांतर हाणामारीत देखील होते. अशावेळी अनेकवेळा पुराव्या अभावी प्रवाशांची सुटका होते. गेल्या काही महिन्यांपासून अशा प्रकरणांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता रेल्वे पोलिसांनी आता कॅमेरा प्रयोग राबविण्याचे निश्चित केले आहे. रेल्वे पोलिसांकडून आता आरपीएफ जवानांच्या गणवेशावरच कॅमेरा बसविण्यात येणार असून याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. या कॅमेराप्रयोगामुळे सुरक्षा दल आणि प्रवाशांमधील भांडणाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबईसह राज्यातील अनेक रेल्वे प्रवासामध्ये काही वेळा प्रवासी आणि आरपीएफच्या जवानांप्रमाणेच अधिकार्‍यांमध्ये वादाचे कटू प्रसंग घडतात. अशावेळी पुराव्यांअभावी नेमकी परिस्थिती समजत नसल्याने कॅमेर्‍यांचा पर्याय देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहेत. रेल्वे पोलिसांच्या गणवेशावर एका बाजूला हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सुरुवातीला अशा प्रकारे ४० कॅमेरे मध्य रेल्वेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानंतर टप्या टप्याने या कॅमेराची संख्या वाढविण्यात येणार आहेत. या कॅमेर्‍यांची किंमत सुमारे ४० हजार रुपये असून त्यामुळे आरपीएफ जवान, अधिकार्‍यांना गाडीमध्ये गस्त घालताना सहाय्य होणार आहे.

- Advertisement -

गाड्यांमधील चोर्‍यांसह गाड्यांमध्ये शिरणार्‍या अनोळखी व्यक्तींवरही लक्ष ठेवण्यास सहाय्य होणार आहे. तिकीट तपासनीसांबरोबरही अनेकदा गैरवर्तन होण्याच्या तक्रारी होतात. त्यालाही आळा घालण्यास मदत मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पूर्वी पश्चिम रेल्वेनी हा प्रकल्प राबिविला होता. सर्व प्रथम पश्चिम रेल्वेने मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमध्ये स्वर्ण प्रकल्पातंर्गत अशा प्रकारचे आठ कॅमेरे पुरविण्यात आले होते. हा प्रकल्प यशस्वी सुद्धा झाला आहेत. त्यामुळे आता पश्चिम रेल्वे नंतर मध्य रेल्वेने सुद्धा रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाच्या गणवेशावर कॅमेरा लावण्यांत आला आहेत.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -