घरमुंबईक्षयरोग रुग्णालयातील रुग्णांना शाकाहारी जेवण, नाश्त्यासोबत अंडे

क्षयरोग रुग्णालयातील रुग्णांना शाकाहारी जेवण, नाश्त्यासोबत अंडे

Subscribe

महापालिकेच्या स्वयंपाकगृहातून रुग्णांना आहारात अंडे दिले जात असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शिवडीतील क्षयरोग अर्थात टि.बी रुग्णालयातील रुग्णांना सध्या इस्कॉन संस्थेच्यावतीने दुपार व रात्रीचे जेवण पुरवले जात आहे. परंतु या संस्थेकडून केवळ शाकाहारी जेवणच पुरवले जात असून उकडलेली अंडी ही रुग्णांना पचण्यास सोपी व जैव उपलब्धतेच्या दृष्टीकोनातून उत्तम असल्याने या रुग्णांना महापालिकेच्यावतीने सकाळी व संध्याकाळी नाश्त्यासोबत अंडे दिले जात आहे. महापालिकेच्या स्वयंपाकगृहातून रुग्णांना आहारात अंडे दिले जात असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आपलं महानगरने केला होता पाठपुरावा

शिवडीतील टि.बी रुग्णालयातील रुग्णांना इस्कॉन संस्थेच्यावतीने दुपार व रात्रीचे जेवण पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. परंतु या संस्थेचा कंत्राट कालावधी संपुष्टात आल्यानंतरही दोन वेळा या संस्थेला मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु हे कंत्राट देताना रुग्णांना मांस व मटण तसेच अंडे आहारात देण्याची सूचना स्थायी समिती सदस्यांनी केली होती. परंतु इस्कॉनला मुदतवाढ देताना, त्यांच्या जेवणाच्या पदार्थांमध्ये अंडे किंवा मांस-मटण यांचा समावेश नव्हता. त्यामुळे मांस-मटण,अंडी न पुरवणार्‍या संस्थेला दोनदा मुदतवाढ अशा आशयाची बातमी आपलं महानगरने प्रकाशित केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत शंभर ठिकाणी होणार ‘या’ उद्यानांची निर्मिती


सकाळ-संध्याकाळी नाश्त्यासोबत अंडे

याबाबत बोलतांना टि.बी रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.ललित आनंदे यांनी क्षयरुग्णांची प्रतिकार शक्ती व कार्यक्षमता वाढवण्यासाठी व योग्य प्रमाणात दर्जेदार उत्कृष्ट व पौष्टीक आहार मिळवणे गरजेचे व अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. शिवडीतील या क्षयरोग रुग्णालयात भरती झालेले रुग्ण हे शारिरीकदृष्ट्या अतिशय कमजोर असल्या कारणाने व क्षयरोगामुळे जेवणाची इच्छा पूर्णपणे कमी होते. तसेच त्यांना मांस-मच्छी पचवणे अवघड जाते. उकडलेली अंडी ही पचण्यास सोपी व जैव उपलब्धतेच्या दृष्टीकोनातून उत्तम असल्यामुळे त्यांचा समावेश आहारामध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार क्षयरुग्णांना प्रत्येक दिवशी सकाळ व संध्याकाळी दोन्ही वेळेस नाश्ता दिला जातो. त्यावेळी रुग्णांना दोन वेळा उकडलेली अंडी रुग्णालयातील स्वयंपाकगृहातून उपलब्ध करून दिली जातात. क्षयरोग रुग्णालयाच्या स्वयंपाक गृहातील सर्व कर्मचार्‍यांचे अन्य रुग्णालयांमध्ये पुनर्वसन केल्यानंतर काही कर्मचारी स्वयंपाक गृहात कायम आहेत. त्यांच्या मदतीने सकाळ व संध्याकाळचा नाश्ता व त्यासोबत अंडे दिले जात असल्याचे रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -