घरमुंबईआता मुंबईच्या अलिशान घरामध्ये वास्तव्य फक्त ६४ रूपयात

आता मुंबईच्या अलिशान घरामध्ये वास्तव्य फक्त ६४ रूपयात

Subscribe

दक्षिण मुंबईच्या ताडदेव भागात ८०० चौरस फुटांच्या भागात तुम्ही दरमहा केवळ ६४ रूपयात राहू शकता. ज्या घरांची किंमत प्रति चौरस मिटर साठ हजार आहे.

तुम्हाला आम्ही जर सांगितलं मुंबईच्या सगळ्यात महागड्या अशा दक्षिण मुंबईत ६४ रूपयात एका अलिशान फ्लॅटमध्ये तुम्ही राहू शकता. तुम्हाला हे ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. दक्षिण मुंबईच्या ताडदेव भागात ८०० चौरस फुटांच्या भागात तुम्ही दरमहा केवळ ६४ रूपयात राहू शकता. ज्या घरांची किंमत प्रति चौरस मिटर साठ हजार आहे.

गेले ११ महिने हे फ्लॅट रिकामे आहेत. आरडी महालक्ष्मीवाला चॅरिटी बिल्डींग ट्रस्ट पारसी समुदाय ट्रस्ट ने या बिल्डींगसाठी काही नियमावली तयार केली आहे. या ट्रस्टने १९४० मध्ये मुंबई पोलिसांबरोबर एक करार केला आहे. या करारात म्हटलं आहे की, हे अपार्टमेंटमधील फ्लॅट केवळ पारसी पोलिस अधिकाऱ्यांनाच दिले जाऊ शकतात.

- Advertisement -

सध्या मुंबई पोलीस खात्यात पारसी समुदायाचे केवळ दोन पोलीस अधिकारी आहेत. त्यातील एका पोलिस अधिकाऱ्याचे पोस्टींग मुंबईच्या बाहेर आहे. तर दुसऱ्या अधिकाऱ्याकडे स्वत:चा फ्लॅट आहे.

मुंबईच्या विकासात पारसी समुदाय महत्त्वाची भुमिका बजावते. त्यामुळे पारशी समुदायातील लोकांना स्थानिक प्रशासनात आणि पोलिसामध्ये मोठ्या प्रमाणावर नियुक्त केलं होतं. मात्र आता पारशी लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. मुंबई पोलिसांनी केवळ पारशी पोलिसांना हे फ्लॅट द्यावेत ही अट काढून टाकण्याची मागणी पारशी ट्रस्टकडे केली आहे. कारण असंख्य पोलिस ऑफिसर या घरांमध्ये रहाण्यास इच्छुक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -