घरमुंबईवाढीव वीजदरांविरोधात ग्राहकांना मांडता येणार हरकती

वाढीव वीजदरांविरोधात ग्राहकांना मांडता येणार हरकती

Subscribe

मांडता येणार सूचना

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल)च्या वीज बिल वाढीच्या मुद्यावर वीज ग्राहकांना आपल्या सूचना, हरकती तसेच तक्रारी दाखल करता येणार आहेत. राज्य वीज नियामक आयोगाने नेमलेल्या दोन सदस्यीय समितीकडून सर्व वीज ग्राहक संघटनांकडून माहिती मिळवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. एईएमएल, टाटा पॉवर, महावितरण, बेस्ट या चारही वीज कंपन्यांच्या जानेवारी महिन्यातील आकडेवारीचा अभ्यास समितीकडून करण्यात येणार आहे.

समितीचा अभ्यास झाल्यानंतर वीज ग्राहकांच्या सूचना, तक्रारी आणि हरकती मागविण्यात येणार असल्याचे कळते. ग्राहकांना वाढीव वीज बिलाबाबतच्या समस्या या समितीकडे मांडता येणार आहेत. समिती या सूचना आणि हरकतीबाबत लवकरच वीज ग्राहकांना आवाहन करणार असल्याचे समजते.अदाणीच्या वीज ग्राहकांना सरासरी वीज बिले मिळाल्यावर अनेक ग्राहकांनी वाढीव वीज बिलाबाबत नाराजी व्यक्त केली होती. वीज ग्राहकांच्या प्रश्नावर पुढाकार घेत राज्य वीज नियामक आयोगाने एक माजी सनदी अधिकारी आणि राज्य वीज नियामक आयोगाचे सदस्य यांची नेमणूक समितीवर केली. वीज बिलात वाढ होण्यासाठीची नेमकी कारणे, तसेच वीज कंपन्यांचे करार, इंधन दरवाढीचा परिणाम याचा अभ्यास समितीकडून करण्यात येईल.

- Advertisement -

३.५० लाख वीज ग्राहकांना सरासरी वीज बिले
याआधी एईएमएलकडून सुमारे साडेतीन लाख वीज ग्राहकांना सरासरी वीज बिले पाठवण्यात आली होती. आतापर्यंत या प्रकरणात राज्य वीज नियामक आयोगाकडून वीज ग्राहकांच्या थेट तक्रारी घेतल्या जात नव्हत्या. पण, समितीला सगळ्या कंपन्यांची आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर वीज ग्राहकांच्या तक्रारी समिती मागवणार असल्याचे कळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -