घरमुंबईऑक्टोबर हिट सुरू; मुंबईकरांना जाणवतोय उकाडा

ऑक्टोबर हिट सुरू; मुंबईकरांना जाणवतोय उकाडा

Subscribe

मुंबईकरांना पहिल्या चार दिवसांमध्येच ऑक्टोबर हिट जाणवू लागली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये फक्त एक मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे, सध्या मुंबईकर पावसांच्या थेंबांनी नाहीतर घामांच्या धारांनी भिजत असल्याचं चित्र आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कोसळलेल्या पावसाने उसंत घेतल्यामुळे मुंबईकरांची उन्हाच्या काहिलीपासून सुटका मात्र काही होत नाही. मुंबईकरांना पहिल्या चार दिवसांमध्येच ऑक्टोबर हिट जाणवू लागली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये फक्त एक मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे, सध्या मुंबईकर पावसांच्या थेंबांनी नाहीतर घामांच्या धारांनी भिजत असल्याचं चित्र आहे. शुक्रवारी सकाळच्या दरम्यान मुंबईकरांनी ढगाळ वातावरण अनुभवलं. पण, त्यानंतर पुन्हा मुंबईत उकाडा वाढला आहे. गेले काही दिवस पावसाच्या विश्रांतीनंतरही लोकांना ऊन लागत होतं. पण, चटके बसत नव्हते. पण, या महिन्याच्या सुरुवातीपासूनच चटके बसू लागले आहेत.

गेल्या आठवड्यापासून मुंबईत पाऊस कमी झाला आहे. पण, अजूनही पावसाने माघार घेतली नसल्यामुळे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे. गुरुवारी सांताक्रूझमध्ये ३२.४ आणि कुलाब्यात ३२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

पुन्हा पावसाची शक्यता 

अरबी समुद्रात मान्सून आता क्षीण ते मध्यम स्वरुपाचा तयार झाल्याकारणाने पुन्हा पावसाची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात सोमवारी , मंगळवारी दक्षिण आणि उत्तर कोकणात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे, काही वेळ तरी तापमानात थंडावा जाणवेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल, असे दिसून येत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -