घरमुंबईमतदारांसाठी ऑफर्स...बल्ले बल्ले!

मतदारांसाठी ऑफर्स…बल्ले बल्ले!

Subscribe

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि मतदार जागृतीसाठी मुंबईतील अनेक समाजसेवक, खासगी व्यासायिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी पुढाकार घेऊन मुंबईकर मतदारांवर डिस्काउंट आणि अनेक ऑफर्सची खैरात केली. मतदान करणार्‍यांना निशुल्क ताक, शीतपेय, पाणी वाटप, वडा पाव वाटप, आंबे, जेवणावर डिस्काऊंट देण्यात आला.

इतके नव्हे तर हॉस्पिटलच्या बिलातसुद्धा सूट देण्यात आली होती. या ऑफर्सना शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सोमवारी लोकसभेसाठी मतदान करणार्‍या मुंबईकरांची बल्लेबल्ले झाली आहे. दरम्यान, नाशिकमधील मतदारांसाठीही हटके ऑफर्स देण्यात आल्या होत्या. हॉटेल्समधील खाद्यपदार्थांवर ५० टक्के सूट, दाढी आणि केस कटिंगवर सवलत, कडकनाथ अंड्यावर ५० टक्के सवलत, ब्रिजमोहन टुरिझमकडून १ हजार भाग्यवान मतदारांंना मोफत दुबई सफर दिली होती.

- Advertisement -

सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरातील लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. नवीन मतदारांची संख्या मोठी होती. मतदारांनी घरातून बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या जनजागृती सोबतच मुंबईतील अनेक सामाजिक, व्यासायिक संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील विविध कंपन्यांनी ऑफर्स आणि सवलती दिल्या. त्यामुळे मुंबईतील मतदानाच्या टक्का नक्कीच वाढला आहे.

मतदान करुन येणार्‍या मुंबईकरांना भाजपचे पदाधिकारी राजेश शिरोडकर यांनी एक डझन आंब्याचा पेटीवर एक डझन आंबे मोफत दिले. तर मयूर डान्स अकॅडमीकडून मतदान करणार्‍यांना थेट डान्स प्रशिक्षण शुल्कावर ५० टक्के सूट देण्यात आली. या डिस्काउंटच्या फायदा १ मेंपर्यंत घेता येणार आहे, अशी माहिती मयूर डान्स अकॅडमीचे संस्थापक मयूर मांडवकर यांनी दिली आहे. यात मुंबईतील हॉटेल चालक, खाद्यपदार्थ स्टॉलधारकसुद्धा मागे नव्हते. मुंबई व मुंबई उपनगरमधील काही हॉटेल मालकांनी खाद्यपदार्थांवर ५० टक्के सवलत दिली होती. मुंबईतील कुर्ला, दादर, चर्चगेट, ग्रांट रोड या सारख्या परिसरात काही स्टॉलमालकांकडून कडक मिसळमध्ये एकावर एक मिसळ फ्री अशी ऑफर देण्यात आली होती. तर काही ठिकाणी वडापाववर एक चाय फ्री देण्यात आला होता.

- Advertisement -

मतदारांसाठी उपचारावर सूट
खारघर ते पनवेल विभागात आरोग्यक्षेत्राला महत्वाचे योगदान देणार्‍या खारघरच्या निरामया हॉस्पिटलतर्फे ३० एप्रिल ते ६ मे दरम्यान वैद्यकीय उपचारांवर मतदान केलेल्या नागरिकांना २० टक्के सवलत मिळणार आहे. ओपीडी सेवा तसेच आंतर रुग्णालयात दाखल केल्यावर करण्यात येणार्‍या उपचारांवर ही सवलत उपलब्ध असणार आहे. अशी माहिती निरामया हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित थडानी यांनी दिली आहे.

तर मुंबईतील अ‍ॅपेक्स हॉस्पिटलतर्फे मतदान केलेल्या मतदारांसाठी मोफत बाह्यरुग्ण सेवा आणि आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार २९ एप्रिल ते ५ मे या कालावधीत मोफत वैद्यकीय सेवा मतदाराला मिळणार आहे. बाह्यरुग्ण विभागात उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांची मोफत रक्तचाचणी, उच्च रक्तदाब, ईसीजी आणि अन्य शारीरिक चाचण्या मोफत करून दिल्या जातील. याशिवाय कर्करोग, बालरोगतज्ज्ञ, हाडांचे विकार, स्त्रीरोग समस्या यासंदर्भात विशेष सल्लादेखील मोफत दिला जाईल.

“देशामध्ये कोणत्याही ठिकाणी मतदान केलेल्या नागरिकाला ही सवलत लागू असून मतदाराचा सन्मान करण्यासाठीच आम्ही ही योजना राबवली आहे. मतदान वाढवणे ही देशभक्ती आहे.
– डॉ. अमित थडानी, संचालक, निरामया हॉस्पिटल

देशात मतदानाचा टक्का खूपच कमी असतो. लोक मतदानासाठी घराबाहेरच पडत नाहीत. पण, योग्य सरकार निवडून देण्यासाठी प्रत्येकाचे मत आवश्यक आहे. यासाठी शाळा आणि महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालयांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आम्ही हॉस्पिटलतर्फे रुग्णांना मोफत बाह्यरुग्ण सेवा देण्याचा निर्णय घेतला.
– डॉ. व्रजेश शहा, संचालक , अ‍ॅपेक्स हॉस्पिटल्स समूह

मतदारांसाठी या होत्या ऑफर्स

1) वैद्यकीय उपचारांवर २० टक्के सवलत
2 ) निशुल्क आरोग्य तपासणी
3) आंब्याचा पेटीवर ५० टक्के सवलत
4 ) डान्स प्रशिक्षण शुल्कावर ५० टक्के सूट
5 ) हॉटेलात जेवणावर ५० टक्के सवलत
6 ) हॉटेलातील खाद्यपदार्थांवर ५० टक्के सवलत
7 ) एकावर एक मिसळ फ्री
8 ) एका वडापाववर एक चहा फ्री
9 ) मतदारांची मोफत आरोग्य तपासणी
१०) मतदान करा उसाचा रस, कैरी पन्हे मोफत
११) मतदानाचे बोट दाखवा हॉटेलमध्ये ५० टक्के सूट
१२) मतदानानंतर मिल्क शेक आणि थंड पाणी फ्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -