घरमुंबईशिक्षण आणि आरोग्यविषयक सुविधांसाठी 'केडीएमसी'वर मोर्चा

शिक्षण आणि आरोग्यविषयक सुविधांसाठी ‘केडीएमसी’वर मोर्चा

Subscribe

शिक्षण आणि आरोग्य विषयक सोयी सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी शिक्षण आरोग्य अधिकार मंचाच्या वतीने महापालिका मुख्यालयावर आज धडक मोर्चा काढण्यात आला.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील शिक्षण आणि आरोग्य विषयक सोयी सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी शिक्षण आरोग्य अधिकार मंचाच्या वतीने शुक्रवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. रिपाई (सेक्युअलर), भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आम आदमी पार्टी आदी विविध सामाजिक-राजकीय संस्थांनी या मोर्चाला पाठींबा दिला होता.

या मागण्यांसाठी काढण्यात आला मोर्चा

शासन निर्णयानुसार आरटीई प्रवेशासाठी ज्या स्तरापासून शाळा सुरु होत आहेत. त्या स्तरापासून प्रवेश देण्यात यावा, प्रवेश स्तर नोंदवत असताना शाळेची पहिलीची निर्धारित केलेली पटसंख्या ग्राह्य धरण्यात यावी, शासन निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई करून त्यांची मान्यता रद्द करावी, शाळेच्या भरमसाठ वाढविण्यात येणाऱ्या शुल्कावर नियंत्रण ठेवण्यात यावे. तसेच महापालिका रुग्णालयांना अत्याधुनिक सोयीसुविधांनी सक्षम करण्यात यावे, त्यामध्ये आयसीयू, इसीजी, एमआरआय, सोनोग्राफी, एक्सरे, सिटी स्कन इत्यादी सुविधा मिळाव्यात, शास्त्रीनगर रुग्णालयात शवागाराची व्यवस्था करावी, वैद्यकीय संवर्गातील ८३ पदे त्वरित भरण्यात यावीत, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांना नोकरीची शाश्वती देऊन योग्य वेतन आणि शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना उपलब्ध असलेल्या सुविधा पुरविण्यात याव्यात आदी मागण्या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. यावेळी मंचाचे अध्यक्ष श्याम गायकवाड, निमंत्रक नितीन धुळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष प्रल्हाद भिलारे, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी आदींच्या शिष्टमंडळाने आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली.

- Advertisement -

आयुक्तांनी सर्व शाळांना नर्सरी-ज्युनियर केजी पासून आरटीईअंतर्गत प्रवेश देण्याच्या सुचना खाजगी शाळांना देण्यात येतील. तसेच महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या रिक्त जागा लवकरच भरण्यात येतील, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याचे धुळे यांनी पत्रकारांना सांगितले.


हेही वाचा – किसान मोर्चा अखेर स्थगित, गिरीश महाजनांच्या मध्यस्थीला यश!

- Advertisement -

हेही वाचा – बिऱ्हाड मोर्चाने उधळली परीक्षा; शिष्टमंडळाची रविवारी मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांशी चर्चा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -