घरमुंबईओला टॅक्सीचालकाकडून महिलेचा विनयभंग

ओला टॅक्सीचालकाकडून महिलेचा विनयभंग

Subscribe

महिला प्रवाशांसाठी ओला असुरक्षितच?

ओला आणि उबेर या अॅपबेस टॅक्सी महिलांसाठी सुरक्षित नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. एका २४ वर्षीय युवतीचा सोमवारी ओला टॅक्सी चालकाने विनयभंग केल्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.

सोमवार दि २१ मे रोजी पीडित युवतीने नरिमन पॉईंट येथून चांदीवलीला जाण्यासाठी ओला टॅक्सी बूक केली होती. जवळपास तीस किलोमिटरचा हा प्रवास होता. प्रवासादरम्यान युवतीला थोडी झोप लागली. ओला कार चालक आपल्याला स्पर्श करत असल्याचे तिला जाणवले. ती कार चालकाच्या बाजूच्या सिटवर बसली होती, त्यामुळे चालकाचा चुकून स्पर्श झाला असल्याचे सुरुवातीला तिला वाटले. पण चालकाचा परत-परत स्पर्श होऊ लागल्याने ती सावध झाली. चांदिवलीला पोहोचताच तिने तिच्या मित्राला प्रवासदरम्यान घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर मित्रा सोबत पवई पोलीस स्टेशन गाठून ओला चालकाविरोधात तक्रार दाखल केली.

- Advertisement -

पवई पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत, ओला चालकाला तात्काळ अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपी चालकाचे नाव सुरेशकुमार यादव, वय ४६ वर्षे असून तो मुळचा नवी मुंबईतील खारघर येथील रहिवाशी आहे. या घटनेबद्दल ओला कंपनीच्या प्रवक्त्यांनी खेद व्यक्त केला असून आरोपी चालकाला तात्काळ कामावरुन काढून टाकले असल्याचे सांगितले. ग्राहकांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता असून पुढील तपासात आम्ही पोलीसांना पूर्ण सहकार्य करु, असा विश्वास व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -