घरताज्या घडामोडीयंदा महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरुन होणार थेट प्रक्षेपण

यंदा महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरुन होणार थेट प्रक्षेपण

Subscribe

कोरोनाची दुसरी लाट येण्याची संभाव्यता लक्षात घेता यंदा राज्य शासनासह महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने दादर येथील चैत्यभूमी स्मारक येथे करण्यात येत असलेल्या पूर्व तयारीची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी केली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची संभाव्यता लक्षात घेता यंदा राज्य शासनासह महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्याबाबतच्या कामकाजाचा विशेष आढावाही घेण्यात आला.

- Advertisement -

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंत्यविधी मुंबईत दादर चौपाटी परिसरात झाले, ती जागा चैत्यभूमी स्मारक म्हणून वंदनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. त्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी व परिसरात वेगवेगळ्या सुविधांची कामे हाती घेतले जातात. प्रामुख्याने चैत्यभूमी येथे पुष्ट सजावट, रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती, दिवाबत्ती यांचा त्यात समावेश असतो. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या कामांची पाहणी करुन आढावा घेतला. तसेच आवश्यक ते निर्देशही दिले.

- Advertisement -

यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा धोका पाहता तसेच त्याची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता, राज्य शासनासह बृहन्मुंबई महानगरपालिका देखील सतर्क व सज्ज आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे शासकीय मानवंदना प्रदान करुन हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तथापि, कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्वांचे पालन करता यावे, कोरोनाचा प्रसार होवू नये म्हणून एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. या कारणाने यंदा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देणार नाही. महापरिनिर्वाण दिनी उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही.

यंदा शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे ऑनलाईन व प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. जेणेकरुन सर्व अनुयायांना आपापल्या घरी राहून, स्थानिक स्तरावरुन अभिवादन करता येईल. प्रत्यक्ष चैत्यभूमी येथे न येता, अनुयायांना अभिवादन करणे शक्य व्हावे म्हणून थेट प्रक्षेपणाची ही विशेष सोय करण्यात येत आहे.


हेही वाचा – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तुत्ववान मराठा स्त्री यावी; शरद पवारांसमोर शेलारांची गुगली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -