विद्यार्थ्यांकडून जवानांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त दादरच्या साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खास भेटकार्ड बनवत सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांना स्वतःच्या हस्ते शुभेच्छापत्रे देत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Mumbai
on this Independence Day special wishes given by students to Soldiers
विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने जवानांना दिली शुभेच्छापत्रे
सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त दादरच्या साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खास भेटकार्ड बनवत सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांना स्वतःच्या हस्ते शुभेच्छापत्रे देत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कर्नल चौहान, राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त कमांडर प्रदीप दीक्षित आणि कमांडो दीपक यांच्या हाती ही शुभेच्छापत्रे सुपूर्त करण्यात आली आहेत. तसेच कर्नल चौहान आणि कमांडो दीपक यांनी देखील विध्यार्थ्यांनसोबत दिलखुलास गप्पा मारत सीमेवरील अनुभव त्यांच्यासोबत शेअर केले आहेत. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी देखील सैनिक सीमेवर कसे राहतात? त्यांची जीवनशैली? यासारखे अनेक प्रश्न कमांडोना विचारत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली आहे.

भेटकार्ड बनवण्याचा उपक्रम

विद्यार्थ्यांनी आठ दिवस स्वातंत्र्यदिनानिमित्त भेटकार्ड बनवण्याचा उपक्रम हाती घेतला होता. गेल्या चार ते पाच वर्षांपासून विद्यार्थ्यांनी तयार केलेली शुभेच्छापत्रे देशाच्या सीमेवरील जवनानापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम राबविला जात आहे. मात्र, यंदा स्वतःच्या हाताने जवानांनाकडे भेटकार्ड देण्याची विद्यार्थ्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे जवानांनी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने भेटकार्ड त्यांच्याकडे सुपूर्त केली आहेत. यावेळी शिवसेना खासदार राहुल शेवाळे, उपमहापौर हेमांगी वरळीकर, माजी आमदार नितीन सरदेसाई, शांतीवन आश्रमाच्या अध्यक्षा रक्षाबेन मेहता आदी उपस्थित होते.
सीमेवरील जवानांना शाळेत आमंत्रित करून विद्यार्थ्यांच्या हस्ते ही शुभेच्छापत्रे देण्यात आली आहेत. प्रकाशभाई यांनी विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच जाज्वल्य देशप्रेमाची भावना जागृत ठेवली. याच भावनेने आमच्या सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छापत्रे बनवतात. तसेच ही सर्व शुभेच्छापत्रे क्रांती दिनी एकत्र करून स्वातंत्र्यदिनी सीमेवर जवनांकडे पाठवली जातात.  गेल्या चार ते पाच वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.  मात्र, यंदा मुलांची इच्छा होती की लष्करी गणवेशातील जवानांनी विद्यार्थ्यांच्या हस्ते शुभेच्छापत्रे स्वीकारावी त्याप्रमाणे  लष्करी पत्रव्यवहार करून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि जवानांनी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांनी बनवलेली शुभेच्छापत्रे जवानांनी स्वीकारली – मोहन मोहाडीकर; बालमोहन ट्रस्टचे सेक्रेटरी