जोगेश्वरीत ड्रग्ज तस्कराला अटक

जोगेश्वरीमध्ये एका ड्रग्ज तस्कराला ताब्यात घेण्यात आले असून या तरुणाकडून १ लाख ३२ हजाराचा एमडीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

Mumbai
arrested
Arrest

जोगेश्वरीत एका ड्रग्ज तस्कराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हा सराईत ड्रग्ज तस्कर असल्याची माहिती समोर आली. या तस्कराकडे ६६ ग्रॅम वजनाचा एमडीचा साठा असल्याची माहिती समोर आली आहे. झाकिर शरिफुल्लाह सय्यद (३०) असे या आरोपीचे नाव असून या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट – १० ने तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अशी केली कारवाई

जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या परिसरामध्ये एक ड्रग्ज तस्कर येण्याची माहिती खबर युनिट – १० ला मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार खबर युनिट – १० च्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे हा ड्रग्ज तस्कर ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या परिसरामध्ये आला. याच्या हालचालीवरुन पोलिसांना त्याचा संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. या अंगझडतीमध्ये झाकिर शरिफुल्लाह सय्यद याच्याकडे ६६ ग्रॅम एमडीचा साठा सापडला. या तस्करीची किंमत १ लाख ३२ हजार इतकी आहे. पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भोईर, पोखरकर, एपीआय पठाण, डोपेवाड आणि महिला एपीआय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.


वाचा – शहरात चार घटनेत ड्रग्ज विक्रीप्रकरणी चौघांना अटक

वाचा – धक्कादायक ! बालिका गृहात मुलींना दिले जायचे ‘ड्रग्ज’

वाचा – व्हॉट्सअॅपवरुन ड्रग्जची तस्करी


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here