घरमुंबईनरेंद्र + देवेंद्र = ११ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

नरेंद्र + देवेंद्र = ११ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

Subscribe

नरेंद्र आणि देवेंद्र जेव्हा एकसाथ येतात तेव्हा एक आणि एक दोन होत नाहीत. तर एकावर एक ११ होतात. महाराष्ट्राला हे डबल इंजिन लागले की, राज्याचा विकास ११ पट वेगाने धावतो, हे आपण पाहिले. त्यामुळे नरेंद्राला जसे तुम्ही दिल्लीत सत्तेत आणले तसेच देवेंद्राला पुन्हा महाराष्ट्राची सत्ता द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खारघर येथील जाहीर सभेत केले.

नवी मुंबई, पनवल येथील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी खारघर येथे जाहीर सभा झाली. मोदी यांनी आपल्या भाषणात राज्याच्या विकासावर जोर दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत तुम्ही केंद्रात पुन्हा नरेंद्राला सत्तेत बसवले. महाराष्ट्रातही तोच कित्ता गिरवून देवेंद्राला सत्तेत बसवा. दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र हा फॉर्म्युला गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक हिट फॉर्म्युला आहे. तोच कायम ठेवत महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जा.

- Advertisement -

भारताच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच विकासासाठी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने भाजपला मताधिक्य दिले. तसेच आमच्या सरकारची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याचे पुन्हा एकदा आपण दाखवून दिले. केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रात भाजप महायुतीने विकास केला आहे.

आज भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाचा स्टार्ट अप फ्रेंडली देश आहे आणि यात महाराष्ट्राची भूमिका महत्वाची आहे. देशासमोर सुरक्षेची आव्हाने आहेत. पण आम्ही त्यावर मात करून पुढे निघालो आहोत, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

२०१४ पूर्वी मुंबई आणि परिसरात रिअल इस्टेट क्षेत्रात अंडरवर्ल्ड आणि बिल्डर माफियांचे संबंध होते, अनेक गोष्टी त्यावेळी घडल्या. त्याचे पडलेले डाग काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आजवर धुऊन काढता आलेले नाहीत. शेतकर्‍यांच्या जमिनी हडपणार्‍या आणि गरीबांच्या घराची स्वप्ने उद्ध्वस्त करणार्‍या लँड माफियांना संपवण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षात झाला. पूर्वी नेत्यांच्या संगनमतातून बिल्डर माफियांची मनमर्जी चालायची. रिअल इस्टेट हे क्षेत्र भ्रष्टाचाराच पैसा खपवण्याचे माध्यम बनले होते, अशा शब्दांत मोदींनी यावेळी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -