घरमुंबईकल्याण स्कायवॉकवरील पत्रे कोसळल्याने एकजण जखमी

कल्याण स्कायवॉकवरील पत्रे कोसळल्याने एकजण जखमी

Subscribe

कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात स्कायवॉकच्या खालील बाजूचे पत्रे कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. स्कायवॉकखाली उभ्या असलेल्या व्यक्तीच्या अंगावर पत्र्याचा भाग कोसळल्याने ती व्यक्ती जखमी झाली आहे.

कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन परिसरात स्कायवॉकच्या खालील बाजूचे पत्रे (अॅल्यूमिनियम शीट) कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. स्कायवॉकच्या खाली उभा असलेल्या रविंद्र चव्हाण नामक व्यक्तीच्या अंगावर पत्र्याचा भाग कोसळल्याने जखमी झाला आहे. मुंबई आयआयटीने स्कायवॉक धोकादायक झाल्याचा अहवाल दिला असून गुरूवारीच ‘दैनिक आपलं महानगरने’ यासंबधीचे वृत्त प्रकाशित केले हेाते. अवघ्या दहा वर्षातच स्कायवॉक आणि जीना कमकुवत होत असून यामध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उजेडात येत आहे. याप्रकरणी पालिका आयुक्तांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी केली आहे.

स्कायवॉक धोकादायक झाल्याचा मुंबई आयआयटीचा अहवाल

गेल्या दीड महिन्यात स्कायवॉकचा पत्रा तुटून पडल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वीही स्कायवॉकचे लोखंडी आणि स्टीलचे स्ट्रक्चर तुटून पडल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच स्कायवॉकवरील प्लास्टिक शीटला आग लागण्याचे प्रकारही घडले होते. ‘मुंबई आयआयटीने’ स्कायवॉकचे जिने आणि पुलाचा काही भाग धोकादायक झाल्याचा अहवाल पालिका प्रशासनाकडे सादर केला असतानाच शुक्रवारी स्कायवॉकखालील पत्रे कोसळल्याची घटना घडल्याने स्कायवाॅकच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

- Advertisement -

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्कायवॉक धोकादायक

कल्याण रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असून पत्रा तुटण्याच्या या सततच्या घटनांमुळे स्कायवॉकखालून चालताना नागरिक जीव मुठीत धरून चालत आहेत. स्कायवॉकचे चार जिने हे वापरासाठी धोकादायक झाल्याने ते बंद करण्याचा अहवाल मुंबई आयआयटीने महापालिकेला दिला आहे. स्कायवॉकची पत्रे कोसळल्यामुळे आता जिन्यांबरोबरच स्कायवॉकच्या सुरक्षितेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अवघ्या १० वर्षांपूर्वी बांधलेला हा स्कायवॉक महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इतक्या कमी काळात धोकादायक बनल्याची टीका नगरसेवक आणि नागरिकांकडून होत आहे.

अवघ्या दहा वर्षांत एखादा पूल अथवा जिना कमकुवत कसा होतो. या प्रकरणी संपूर्ण चौकशी होणे गरजेचे आहे. काही लोकांच्या मर्जीखातर या पूलाची दिशाही वळविण्यात आली होती. पुलाच्या कामात भ्रष्टचार झाला असून, याची संपूर्ण चौकशी केली पाहिजे.

मंदार हळबे गटनेता, मनसे

ही घटना घडल्या नंतर प्रशासनाने सावध पावले उचलायला हवीत, जर सूचना देऊनही कार्यवाही केली नसेल किंवा हलगर्जीपणा केला असेल तर आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई करावी.

राजेंद्र देवळेकर, माजी महापौर, नगरसेवक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -