घरमुंबईचोरीच्या संशयावरुन तरुणाची केली हत्या!

चोरीच्या संशयावरुन तरुणाची केली हत्या!

Subscribe

पोलिसांनी चार तरुणांना अटक केली आहे. या मारहाणीत मृत झालेला राहुल याने मोबाईल चोरला होता की नाही हा तपासाचा भाग असला तरी राहुल याच्यावर पार्कसाईड पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक जाधव यांनी दिली आहे.

मोबाईल फोन चोरल्याच्या संशयावरुन एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी विक्रोळी पूर्वच्या चंदननगर येथे घडली. याप्रकरणी पार्कसाईड पोलिसांनी चार इसमांना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले तिघेजन सख्खे भाऊ आहेत. राहुल चंद्रकांत पांचाळ (१९) असे मृत तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा – जैन सोसायटीतील वृद्घांना लक्ष्य करणार्‍या सोनसाखळी चोराला अटक

- Advertisement -

नेमकं काय आहे प्रकरण?

विक्रोळी पूर्व चंदननगर येथील गुलाम चाळ या ठिकाणी राहणारा राहुल याच्यावर पार्कसाईड पोलीस ठाण्यात अनेक चोरीचे गुन्हे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच परिसरात सुरेश वर्मा,सुरेंद्र वर्मा आणि शिवकुमार वर्मा हे भावंड राहतात. काही दिवसांपूर्वी सुरेश वर्मा याचा मोबाईल फोन घरातून चोरीला गेला होता. आणि तो मोबाईल फोन राहुलनेच चोरला असावा असा संशय या वर्मा भावंडांचा होता. रविवारी सायंकाळी या तिघांनी आणि त्यांचा एक मित्र मोनू पांडे यांनी राहुलला परिसरात गाठून त्याच्याकडे फोन बाबत विचारणा केली. मात्र मी फोन चोरला नसल्याचे त्याने सांगितले. या चौघानी त्याचे एक न ऐकता त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत राहुल हा गंभीररीत्या जखमी झाला. लोकांनी त्याला विक्रोळीच्या महात्मा फुले रुग्णालयात नेले. रुग्नालयात डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सुरेश वर्मा, सुरेंद्र वर्मा, शिवकुमार वर्मा आणि मोनू पांडे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. चौघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांनी दिली आहे. या मारहाणीत मृत झालेला राहुल याने मोबाईल चोरला होता की नाही हा तपासाचा भाग असला तरी राहुल याच्यावर पार्कसाईड पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती जाधव यांनी दिली.


हेही वाचा – शहरात चार घटनेत ड्रग्ज विक्रीप्रकरणी चौघांना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -