धारावीत इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू

धारावीत एका बांधकाम इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Mumbai
one part of building collapse in Dharavi one dead
धारावीत इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू

मुंबईच्या धारावी येथील पीएमजीपी कॉलनीमध्ये एका बांधकाम इमारतीचा भाग कोसळला. या घटनेमध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी रात्री १०:३० च्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेतील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस आणि अग्निशमन दखल घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले.

रिक्षाचालकाचा मृत्यू

या इमारतीच्या बाजूने एक रिक्षा जात होती. तेवढ्यात इमारतीचा काही भाग त्या रिक्षावर कोसळला. या रिक्षेच्या बाजूला एक मोटारसायकल देखील होती. या दुर्घटनेत रिक्षाचालकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर मोटरसायकलवरुन जाणारी व्यक्ती जखमी झाली. त्या व्यक्तीला ताबोडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं.