सिद्धिविनायक दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करावं लागणार

Online booking will be required for Siddhivinayak Darshan
सिद्धिविनायक दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करावं लागणार

पाडव्याच्या मुहुर्तावर राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्याच्या परवानगी ठाकरे सरकारने दिली आहे. त्यामुळे उद्यापासून मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. पण सिद्धिविनायक दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला श्री.सिद्धिविनायक गणपती टेमल (Shree Siddhivinayk ganapti temple) असा App डाऊनलोड करायचा आहे. या Appच्या माध्यमातून भाविकांनी नोंद केल्यावरच प्रवेश दिला जाईल. तसेच ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी भाविकांनी दर्शन घेता येणार आहे, असं पत्रकार परिषदेमध्ये सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर म्हणाले की, ‘उद्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं करणार आहोत. पण हे करत असताना अत्यंत अध्ययावत असं संगणक प्रणालाची उपयोग करून एक यंत्रणा तयार केलेली आहे. प्रत्येक भाविकाला श्री.सिद्धिविनायक गणपती टेम्पल (Shree Siddhivinayk ganapti temple) असा App डाऊनलोड करायचा आहे. अँड्रॉईड किंवा Apple App स्टोअरवर हा App डाऊनलोड करू शकता. हा App डाऊनलोड केल्यानंतर यामध्ये दिलेल्या सर्व गोष्टी नोंद केल्यावर ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी भाविकांना दर्शन घेता येणार आहे. तसेच नोंद झाल्यावर क्यूआर कोट देखील दिला जाईल.’

पुढे आदेश बांदेकर म्हणाले की, ‘मार्गदर्शक सूचना नुसार भाविकांची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक भाविकांचं सहकार्य यामध्ये अपेक्षित आहे. भाविकांनी जास्त गर्दी करू नये. पहिल्यांच दिवशी दिवसभरात ज्या भाविकांनी क्युआर कोट जनरेट केला आहे, अशा १ हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार आहे. प्रतितास १०० भाविक यामध्ये दुपारची नैवेद्य आणि पूजेची वेळ आणि संध्याकाळची धुपाआरती आणि आरती वेळ या व्यतिरिक्त सकाळी ७ वाजल्यापासून तुम्ही एक-एक तासाच्या सॉल्टमध्ये दर्शनाची वेळ नोंद करू शकता. क्युआर कोटच्या साहाय्याने तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकता. ‘