घरमुंबईक्रेडिट कार्डमधून 42 हजार रुपये काढले

क्रेडिट कार्डमधून 42 हजार रुपये काढले

Subscribe

फोनवरून ऑनलाईन फसवणूक

आम्ही क्रेडिट कार्ड कंपनीमधून बोलत असून वेगवेगळ्या स्किम सांगून क्रेडिट कार्डचा इलेक्ट्रॉनिक डेटा चोरी करून त्याचा वापर करून एका 41 वर्षांच्या इसमाची 42 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळोजा फेज 2 येथील चिराग दौलतराय नाईक हे परास डिफेन्स अन्ड स्पेस टेक्नलजी लि. नेरूळ येथे काम करत आहेत. त्यांना कथित एसबीआय क्रेडीट कार्ड कंपनीमधून फोन आला. त्यावेळी चिराग यांनी बोलण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा काही वेळाने त्यांचा पुन्हा फोन आला व त्यांनी चिराग यांना कार्ड डिटेल्स सांगितल्या व त्यांनी विश्वास सपांदन करून चिराग यांना वेगवेगळ्या स्किम सांगण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी चिराग यांना काही ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी सांगितले. तसेच ओटीपी सांगण्यास सांगितला. मात्र, चिराग यांनी प्रत्यक्ष भेटून स्कीम समजावून सांगा असे सांगून त्यांचा फोन कट केला. त्यानंतर पुढील पाच मिनिटात चिराग यांच्या बँक खात्यातून 41 हजार 976 रुपये काढण्यात आले. चिराग यांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -