घरमुंबईवाढदिवस लता मंगशेकरांचा पण ट्रेंड होतय भारतरत्न

वाढदिवस लता मंगशेकरांचा पण ट्रेंड होतय भारतरत्न

Subscribe

एस पी बालासुब्रमण्यम यांना भारतरत्न मिळावा म्हणून याचिका

आज लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जगभरातून ट्विटरवर शुभेच्छा येत आहेत खऱ्या. पण आज लता मंगेशकर यांच्यापेक्षा ट्विटरवर ट्रेंडिंग आहे तो म्हणजे भारतरत्न. संगीत रसिकांचे चाहते असणाऱ्या एस पी बालासुब्रमण्यम यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून आता ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली आहे. आतापर्यंत २१ हजारांहून अधिक चाहत्यांना त्यांना भारतरत्न मिळावा म्हणून या याचिकेवर आपला डिजिटल सहभाग नोंदवला आहे. दक्षिणेतल्या चाहत्यांकडूनच चेंज डॉट ओआरजीवर ही ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

एस पी बालासुब्रमण्यम यांच्या अष्टपैलु व्यक्तीमत्वामुळेच त्यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी चाहत्यांकडून होत आहेत. चाहत्यांनी ही याचिका दाखल करताना आपल्या भावना व्यक्त करत नमुद केले आहे की, गॉड ऑफ म्युझिक, जे कोट्यावधींसाठी एक प्रकारची स्फुर्ती होते. हजारो निराशेतल्या लोकांना त्यांच्या गाण्याने नवचेतना दिली. गेली पाच दशके म्युझिक इंडस्ट्रीला आपल्या योगदानातून त्यांनी एक वेगळच स्थान चाहत्यांच्या मनात तयार केले आहे. त्यांना खरच काही श्रद्धांजली होऊ शकते तर ती म्हणजे त्यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान होऊनच. त्यांचा हा सन्मान म्हणजे तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि केरळ या देशभरातील आणि जगभरातील चाहत्यांचा सन्मान असेल. वेगवेगळ्या १६ भाषांमध्ये गाणी गाण हा एक वेगळाच विक्रम आहे. त्यांनी गाठलेले उदिष्ट कोणीही गाठू शकत नाही. त्यांच गाण फक्त अनुभवलच जाऊ शकत. म्हणूनच आम्ही सगळ एस पी बालासुब्रमण्यम यांचे चाहते म्हणून सरकारला विनंती करतो की या संगीताची सेवा करणाऱ्या सेवकाला भारतरत्न पुरस्कार मिळावा.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -