मुंबईत शनिवारपासून ऑनलाईन दारुची विक्री

Mumbai
home delivery of liquor will be available in the state excise department decision
liquor

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी ४ मेपासून लॉकडाऊनचा कालावधी शिथिल करण्यासंदर्भात काही अटी सापेक्ष दारुच्या दुकानांसह बिगर अत्यावश्यक सेवांची पाच दुकाने एका मार्गावर सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. परंतु महापालिकेचे तत्कालिन आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी मुंबईतील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत मद्य विक्रीसह अन्य दुकाने खुली ठेवण्यास परवानगी नाकारली होती. परंतु आता नवीन महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईत ऑनलाईन मद्य विक्री करण्यास परवानगी दिली आहे. बाटलीबंद दारू ऑनलाईन पध्दतीने केलेल्या मागणीनुसार घरपोच देण्यास परवानगी दिली आहे. मात्र, दारुची विक्री कंटेन्मेंट झोन अर्थात बाधित क्षेत्र वगळता अन्य भागांमध्येच करता येणार आहे.

महाराष्ट्र शासनाने ४ मे पासून लॉकडाऊनचा कालावधी शिथिल करण्यासंदर्भात काही अटी सापेक्ष काही सेवा सुरू करायला परवानगी दिली होती. परंतु या शिथिलीकरणात लोक अपेक्षित असलेली शिस्त पाळत नसल्यामुळे इतक्या दिवसांपासून आपण घेतलेली मेहनत वाया जाऊ शकते. तसेच अशा परिस्थितीत शासनाने पालिका आयुक्तांना दिलेल्या विशेषाधिकाराचा वापर करून, मुंबईत फक्त पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील असा फतवा जारी करत विभागीय सहायक आयुक्तांना यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे एका दिवसात दारुची दुकाने बंद करावी लागली होती. मात्र, मुंबई वगळता अन्य ठिकाणी दारुची दुकाने सुरू असतानाच मुंबईतील मद्यप्रेमींची गैरसोय होत होती. त्यामुळे अखेर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी शुक्रवारी परिपत्रक जारी करून ऑनलाईन मद्य विक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, दारुची दुकाने उघडून त्यांना याची विक्री करता येणार नाही. तर ऑनलाईन पध्दतीने झालेल्या मागणीनुसार, ग्राहकांना त्यांच्या घरी सिलबंद मद्याच्या बाटल्यांची विक्री करता येऊ शकते. परंतु, करोना रुग्ण आढळून आलेल्या बाधित क्षेत्रात अथवा सिलबंद इमारतीत या मद्यविक्रीचा पुरवठा करता येऊ शकणार नाही,असे आयुक्तांनी आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here