घरताज्या घडामोडीशिवसेनेला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा एकमेव अजेंडा! - महापौर किशोरी पेडणेकर

शिवसेनेला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा एकमेव अजेंडा! – महापौर किशोरी पेडणेकर

Subscribe

मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना मुंबई महानगर पालिकेवर सुरुवातीपासूनच टीका केली जात आहे. शिवसेनेची पालिकेमध्ये सत्ता असून मुंबईतली परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली गेली नाही, असा आरोप सातत्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपने केला आहे. त्यातच महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी विरोध तीव्र केलेला असताना या दोन्ही गोष्टी शिवसेनेसाठी आगामी पालिका निवडणुकांमध्ये महागात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुकांसाठी शिवसेनेची नक्की स्ट्रॅटेजी काय आहे? महापौरांनी मुलाच्या कंपनीला कंत्राट का दिलं? किरीट सोमय्यांनी सुरू केलेल्या शिवसेनाविरोधी मोहिमेला सत्ताधाऱ्यांकडे काय उत्तर आहे? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या खुल्लम खुल्ला या कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर यांना बोलावण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी विरोधकांवर कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढले.

‘विरोधकांचा एकमेव अजेंडा शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना बदनाम करायचं हा आहे’, असं किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या. ‘ज्यांच्याकडे प्रशासकीय ज्ञान नाही असं म्हटलं गेलं होतं, त्या उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला देशात कोरोना नियोजन चांगलं करणाऱ्या पहिल्या ५ राज्यांमध्ये आणलं. उलट विरोधकांनी आंदोलनं करून कोरोना वाढवला. यामध्ये मास्क, सोशल डिस्टन्सिंग कोणत्याही प्रकारे पालन केलं गेलं नाही’, असा देखील आरोप त्यांनी केला.

- Advertisement -

मुलाला फक्त १५ दिवसांचं कंत्राट

दरम्यान, किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या नावे असलेल्या क्रिश कंपनीला मुंबई महानगर पालिकेचं कंत्राट दिलं गेलं, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्याला उत्तर देताना महापौर म्हणाल्या, ‘मुलाला फक्त १५ दिवसांचं कंत्राट मिळालं. क्रिश नावाच्या कंपनीला वॉर्डमधलं कॉन्ट्रॅक्ट काढून दिलं गेलं. किरीट सोमय्यांनी याचं भांडवल केलं. त्यांना त्यासाठीच नेमलं गेलं आहे. पालिकेचं कोणतंही कंत्राट असं उचलून देता येत नाही. त्याला एल-१ मध्ये यायला हवं. शिवाय त्या वेळी कामाला कर्मचारी मिळत नव्हते. म्हणून ते कंत्राट दिलं’, असं महापौर म्हणाल्या.

‘केईएम, नायर, सायनमध्ये मुंबईबाहेरच्या लोकांनाही ट्रीटमेंट मिळतेय. १०० बेडच्या ठिकाणी ५०० पेशंट येत आहेत. तरी त्यांना व्यवस्था करून दिली जात आहे. मुंबईकर याच कामासाठी मतदान करतात आणि म्हणून शिवसेनेची २५ वर्षांपासून मुंबई पालिकेवर सत्ता आहे’, असं देखील पेडणेकर यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -