घरमुंबईसायन फ्लायओव्हर दुरुस्तीसाठी ‘ऑपरेशन ४५’

सायन फ्लायओव्हर दुरुस्तीसाठी ‘ऑपरेशन ४५’

Subscribe

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणार

सायन फ्लायओव्हरच्या दुरूस्तीच्या कामासाठी मुंबई राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई वाहतूक पोलीस यांच्यामार्फत संयुक्तीक असा ‘टॅ्रफिक मॅनेजमेंट प्लान’ आखण्यात येणार आहे. लवकरच दोन्ही विभाग आणि कंत्राटदार कंपनीचे सर्वेक्षण सायन फ्लायओव्हरच्या कामाच्या निमित्ताने होणार आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस या कामाला सुरुवात होणार आहे. सायन फ्लायओव्हरच्या दुरूस्तीच्या कामासाठी ४५ दिवसांचे टार्गेट एमएसआरडीसीने ठेवले आहे. येत्या आठ ते दहा दिवसात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.

सायन फ्लायओव्हरच्या वाहतुकीच्या रहदारीमुळे हा फ्लायओव्हर १८ वर्षातच दुरूस्त करण्याची वेळ एमएसआरडीसीवर आलेली आहे. आयआयटी मुंबईने मुंबईतील फ्लायओव्हरचे सर्वेक्षण करताना सायन फ्लायओव्हरच्या तात्काळ दुरूस्तीचा अहवाल एमएसआरडीसीकडे सादर केला होता. त्यामुळेच तातडीने या फ्लायओव्हरच्या देखभाल आणि दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. सायन फ्लायओव्हरच्या गर्डरखालच्या बेअरींग बदलण्याच्या कामाअंतर्गत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच या बेअरींग कामासाठी उपलब्ध होतील.

- Advertisement -

सायन फ्लायओव्हरसाठी वाहतूक व्यवस्थेसाठीची अंतिम मंजुरी सहआयुक्त वाहतूक यांच्याकडून मिळाल्यानंतर या कामाला सुरूवात करण्यात येईल. गर्डर उचलण्यासाठी जॅकचा वापर करण्यात येणार आहे. सध्याच्या तुटलेल्या आणि खराब झालेल्या गर्डर बदलून त्याठिकाणी नवे गर्डर वापरण्यात येतील. दक्षिण मुंबई दिशेने जाणार्‍या वाहतुकीवर तसेच ठाण्याच्या दिशेने जाणार्‍या वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळेच पर्यायी वाहतूक व्यवस्था कशी सुरळीत करावी यासाठीचा एक्शन प्लॅन झाल्यानंतरच सायन प्लायओव्हरचे काम सुरू करण्यात येईल. पावसाळा सुरू होण्याआधी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएसआरडीसीमार्फत ठेवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -