घरमुंबई'मुख्यमंत्र्यांचे मुंबई तर उपमुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे लक्ष; उर्वरित जिल्हे वाऱ्यावर'

‘मुख्यमंत्र्यांचे मुंबई तर उपमुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे लक्ष; उर्वरित जिल्हे वाऱ्यावर’

Subscribe

राज्यातील दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आज, मंगळवारी समाप्त झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आभाराच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. त्यांनी या दोन दिवसीय अधिवेशनात सरकारच्या कामगिरीवर समाधानी नसल्याचे मत मांडत, सरकारने आमच्या कोणत्याही समस्येचे निरसन केले नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच कोरोनाची स्थिती महाराष्ट्रात भयंकर असून मुख्यमंत्र्यांचे मुंबईकडे तर उपमुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे लक्ष असून राज्यातील उर्वरित जिल्हे त्यांची वाऱ्यावर सोडले आहेत, असा घणाघाती आरोप यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस 

मुख्यमंत्र्यांनी मुंबई पाहायची, उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पाहायचे, मग इतर ठिकाणी कोण बघणार? नागपूर, औरंगाबादमध्ये कोण पाहणार? राज्यात कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनत आहेत. तेथील साधा आढावा घेतला नाही, मुंबई-पुण्याइतकेच तुमचे राज्य मर्यादित आहे का?. पुण्यातील जम्बो सेंटरमध्ये पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. उमदा पत्रकार गेला, मात्र त्याची एन्ट्रीच केलेली नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच, ज्याप्रकारे अनेक विषय काढत आहात, त्यावरुन तुम्हाला कोरोनाविषयीच्या मागण्यांवर बोलायचे नाही हे दिसत आहे. राज्यातील अनेक विषय आहेत, जे आठ दिवस संपणार नाहीत. मात्र आम्हालाही समजते. महाराष्ट्र सर्वात नंबर एक आहे, मात्र कोरोनातही व्हावा, हे वाटले नव्हते. पाच राज्य मिळून ७० टक्के मृत्यू आहेत. मात्र त्यात ५० टक्के महाराष्ट्राचे आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

Corona : महाराष्ट्रासह ‘या’ चार राज्यात मिळून ७० टक्के कोरोनाबाधितांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -