गिरीश महाजन म्हणतात, आता नातवंडही पळवू

निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता राजकीय गणित बदलू लागली आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत आहेत. याचपार्श्वभूमीवर एकमेकांना यावरून टोला मारणंही राजकीय नेत्यांमध्ये सुरू आहे.

Mumbai
Girish Mahajan
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पक्षा-पक्षांमधून नेत्यांची पळवापळवी सुरू झाली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे शिवबंधन सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हातात घेतलं. त्यानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते विखे पाटील यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला. या पळवापळवीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पळवापळवी वरून ट्विटही केलं. ‘आता विरोधकांची मुलेच नव्हे, तर नातवंडेही पळवणार आहोत’, असं म्हणत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आव्हाडांना टोला लगावला.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

सुजय विखेंच्या प्रवेशानंतर आता मुले पळवणारी टोळी आली असून, काँग्रेस-राष्ट्रवादीच्यानेत्यांनी सावध राहावे, असे ट्विट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.

गिरीश महाजनांचा आव्हाडांना टोला

जितेंद्र आव्हाडांच्या या ट्विटवरून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना विचारलं असता, ते म्हणाले, ते मुले नातवंड सांभाळू शकत नाहीत का? विरोधकांनी आत्मपरिक्षण करावे, असं सल्ला त्ययांनी दिला. पुढे ते म्हणाले, काही पक्षात आमचे घर म्हणजे आमचा पक्ष असे समीकरण आहे, मग कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का? सुजय विखे-पाटील यांच्यामागे विखे-पाटील यांचा मोठा वारसा आहे. ते मोठे संस्थानिक आहेत. त्यांच्याकडचं कोणीही आमच्याकडे येत असतील,तर त्यांचे स्वागत आहे. मात्र केवळ आमच्याकडेच असे इनकमिंग नाही. त्यांनीही धनंजय मुंडे,भास्कर जाधव, नाना पटोले यांना पळवले नाही का? असेही महाजन यांनी विचारले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here