घरमुंबईऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचारी संपावर

ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचारी संपावर

Subscribe

केंद्राकडून खासगीकरण होत असल्याचा आरोप

ऑर्डनन्स फॅक्टरीचे केंद्र सरकार खासगीकरण करीत असल्याचा आरोप करीत कामगार व कर्मचारी संघटनांनी बंद पुकारला आहे. केंद्रसरकारच्या विरोधात विविध कामगार संघटना रस्त्यावर उतरले असून त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. केंद्र सरकार हे ऑर्डनन्स फॅक्टरीमधील कर्मचार्‍यांना विश्वासात न घेता खासगीकरणाचा घाट घातल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे.

अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी येथे मानवी साखळी करत सरकारचा निषेध नोंदवला. दरम्यान, सर्व कर्मचार्‍यांनी आजपासून एक महिन्याच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार हे देशातील आणि राज्यामधील एकूण 41 ऑर्डनन्स फॅक्टरींच्या खासगीकरणाच्या वाटेवर असून याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अशावेळी कामगार संघटना, कर्मचारी, अधिकार्‍यांना विश्वासात न घेता संबंधित विषयावर परस्पर निर्णय घेण्याचे ठरविले असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. त्यामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण 10 तर देशात 41 ऑर्डनन्स फॅक्टरी आहेत. त्यापैकी दोन फॅक्टरी या अंबरनाथ परिसरात आहे. यात एकूण अडीच हजार कर्मचारी यात काम करत असून त्यांच्या कुटुंबाची उपजीविका यामधून चालते.

- Advertisement -

तिन्ही सशस्त्र दले, सर्व निमलष्करी दले, सर्व केंद्र शासित पोलीस दलांना वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पुरवण्याचे काम या फॅक्टरीच्या माध्यमातून करण्यात येते. मात्र, सद्य स्थितीला केंद्र सरकारने सर्व भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. देशभरात एकूण 1 लाख कर्मचारी हे या फॅक्टरींवर अवलंबून आहेत. अशी माहिती कर्मचार्‍यांनी दिली. दरम्यान, यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून बुधवारपासून एक महिना केंद्र सरकारचा विरोध करण्यासाठी संपावर जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -