घरमुंबईअवयवदानातून सहा जणांना जीवदान

अवयवदानातून सहा जणांना जीवदान

Subscribe

नवीन वर्षात आतापर्यंत २७ अवयवदान पार पडले आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या अवयवदानामुळे सहा जणांना जीवदान मिळण्यास मदत झाली आहे.

अवयवदानाबाबत वाढलेल्या जनजागृतीमुळे या नवीन वर्षात आतापर्यंत २७ अवयवदान पार पडले आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या अवयवदानामुळे सहा जणांना जीवदान मिळण्यास मदत झाली आहे.

५९ वर्षांच्या या महिलेला १८ मार्च, २०१९ ला नवी मुंबईच्या वाशीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती खूप गंभीर होती, तपासणीत त्यांचं ब्रेन हॅमरेज झाल्याचं निदान झालं. पण, डॉक्टारांच्या अथक प्रयत्नांनंतरही या महिलेला वाचवणं शक्य झालं नाही. १९ मार्च, २०१९ ला डॉक्टरांनी महिलेला ब्रेनडेड घोषित केलं. या महिलेचं कुटुंब अवयवदानाबाबत जागरूक होतं. त्यामुळे रुग्णाच्या अवयवदानासाठी त्यांनी पुढाकार घेतला. कुटुंबाच्या परवानगीनुसार महिलेचे अवयव आणि टिश्यू दान करण्यात आले. या महिलेचं यकृत, किडनी, तसंच डोळे आणि हाडं दान करण्यात आली. विभागीय प्रत्यारोपण समन्वयक समितीच्या झेडटीसीसीच्या  नियमावलीनुसार गरजूंना अवयव देण्यात आले आहेत.

- Advertisement -

अपोलो हॉस्पिटलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, यकृत ग्लोबल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. एक किडनी अपोलो हॉस्पिटलमध्ये तर दुसरी किडनी ज्युपिटर हॉस्पिटलमधील रुग्णाला देण्यात आली. डोळे लक्ष्मी आय बँकेत आणि हाडं टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये दान करण्यात आलं आहे.

मुंबईत २७ वं अवयवदान

- Advertisement -

मुंबईत वीस मार्चला अंधेरीत कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये अवयवदान झालं आहे. एका ४६ वर्षीय व्यक्तीचं अवयवदान करण्यात आलं आहे. या व्यक्तीच्या अवयवदानामुळे तीन जणांना जीवनदान मिळण्यास मदत झाली. विशेष म्हणजे या आठवड्यातील हे दुसरं अवयवदान आहे. कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे रूग्णाला ब्रेनडेड घोषित करण्यात आलं. कुटुंबाचं अवयवदानासंदर्भात समुपदेशन केल्यानंतर त्यांनी अवयवदानाला परवानगी दिली. या कुटुंबाला अवयवदानासंदर्भात माहिती होती. या अवयवदानामुळे इतरांना जीवनदान मिळण्यास मदत झाली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -