घरमुंबईमहिलेच्या अवयवदानामुळे ५ वर्षाच्या मुलाला जीवदान

महिलेच्या अवयवदानामुळे ५ वर्षाच्या मुलाला जीवदान

Subscribe

कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये पार पडलेले हे ४७ वे अवयवदान आहे आणि २४ वे हृदय दान आहे. फोर्टिस रूग्णालयात २३ वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.

मुंबईत ४७ वं अवयवदान यशस्वी पार पडले आहे. एका महिलेच्या अवयवदानामुळे ५ वर्षाच्या मुलाला जीवदान मिळाले आहे. कांदिवलीत राहणाऱ्या एका ५१ वर्षीय महिलेने अवयवदान केले. लक्ष्मी तिवारी (बदललेले नाव) यांच्या अवयवदानामुळे एका ५ वर्षाच्या मुलाला जीवदान मिळाले आहे. शिवाय या महिलेल्या जीवदानामुळे तिघांना जीवदान मिळाले आहे.

अवयवदान करा…तोच आमचा आहेर !

कुटुंबियांनी घेतला अवयवदानाचा निर्णय

कांदिवलीत राहणाऱ्या लक्ष्मी तिवारी (नाव बदललेले, ५१) या घरी अचानक कोसळल्या. कुटुंबियांना वाटले त्यांना चक्कर आली म्हणून त्यांनी डॉक्टरांना घरी बोलावले. त्यांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. परीसरातील रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.त्यानुसार त्यांना कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिटीस्कॅन, एमआरआय या सगळ्या चाचण्या केल्या. पण त्या शुद्धीवर येत नव्हत्या. उपचारादरम्यान त्या ब्रेनडेड असल्याचे घोषित केले. हे कळल्यानंतर लक्ष्मी यांचे पती आणि दोन मुलांनी त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांची किडनी, फुप्फुसे,ह्रदय, डोळे (कार्निया) आणि त्वचा हे दान करण्यात आले.

- Advertisement -
एकाच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान

५वर्षाच्या मुलाला यकृतदान

महिलेचे ह्रदय आणि किडनी कोकिलाबेन रुग्णालयातील एका रुग्णाला दान करण्यात आले. तर ग्लोबल रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ५ वर्षीय मुलाला यकृताची गरज होती. त्याला यकृत दान करण्यात आले. तर दुसरी किडनी आएनएच अश्विनी रुग्णालयातीलल रुग्णाला देण्यात आले. तर डोळे लोटस आय रुग्णालयात पाठविण्यात आले. आणि त्वचा ही त्वचा बँकेत देण्यात आली. यातील फुफ्फुसे अद्याप कोणालाही दान करण्यात आले नाही.

मुंबईतील ४७ वे अवयवदान, २४ वे हृदय दान

कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये पार पडलेले हे ४७ वे अवयवदान आहे आणि २४ वे हृदय दान आहे. फोर्टिस रूग्णालयात २३ वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. विशाखापट्टणला राहणाऱ्या १७ वर्षीय तरूणाच्या अवयवदानाने मुंबईतील ५२ वर्षीय व्यक्तिला नव्याने जीवदान मिळण्यास मदत झाली आहे.

महिलेला कसल्याच आजाराचं निदान झालेलं नव्हतं. डायबिटीस किंवा हायपरटेंशन असाही प्रकार आढळून आला नाही. त्या घरीच कोसळल्या आणि बेशुद्ध झाल्या. इथे आणलं तेव्हाही त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले पण, काही काळाने त्यांना ब्रेनडेड घोषित केलं. नंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, किडनी, यकृत, हृदय तसंच डोळे आणि त्वचा हे अवयवदान केले आहेत. ‘

-रेखा बरोट, अवयवदान समन्वयक समिती, कोकिलाबेन रुग्णालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -