घरमुंबईठाणे महापालिकेच्यावतीने लोकशाही पंधरवडाचे आयोजन

ठाणे महापालिकेच्यावतीने लोकशाही पंधरवडाचे आयोजन

Subscribe

ठाणे महानगर पालिकेच्यावतीने 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकशाही पंधरवडा कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने पालिकाक्षेत्रात विविध प्रसार माध्यमाच्याद्वारे लोकशाही, निवडणूक व सुशासन याविषयी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने राष्ट्रध्वजाचे आरोहण महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या सुरक्षा दल, अग्निशामक दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तत्पुर्वी महापालिका अतिरिक्त आयुक्त(2) समीर उन्हाळे यांना अग्निशमन दल व सुरक्षा दलाच्या जवानांनी सलामी दिली. यावेळी लोकशाही बळकट करण्याचा निर्धार पालिका प्रशासन व पदाधिकारी यांनी केला. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या नागरी दैनंदिनी 2019 चे महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.

- Advertisement -

या प्रसंगी शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, नगरसेवक नारायण पवार, अतिरिक्त आयुकत (2) समीर उन्हाळे, उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, मनीष जोशी, मुख्य लेख व वित्त अधिकारी मनेष वाघीरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर.टी.केंद्रे, अधिष्ठाता संध्या खडसे, उप नगर अभियंता रवींद्र खडताळे, सहाय्यक आयुक्त डॉ.अनुराधा बाबर, डॉ.चारुशीला पंडीत, अनघा पगारे, शंकर पाटोळे, मारुती गायकवाड, झुंझार परदेशी, विजयकुमार जाधव, सचिन बोरसे, महेश आहेर, महादेव जगताप, वैद्यकीय अधीक्षक राजीव कोर्डे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

भारतीय राज्यघटनेत लोकशाही मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. येणार्‍या प्रत्येक निवडणुकीमध्ये नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभागी व्हावे.तसेच ज्या युवकांचे नाव मतदान यादीत समाविष्ट नाही, त्यांनी तात्काळ आपले नाव नोंद करून लोकशाही बळकट करण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हावे.
-नरेश म्हस्के, सभागृह नेते, ठाणे महानगर पालिका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -