नवरात्रोत्सवानंतर मुंबईत मानसिक आजारांसाठी ‘मनोत्सव’चं आयोजन

मानसिक आजारांपासून बचाव करण्यासाठी तसंच कशापद्धतीने उपचार घेतले जावेत यासंदर्भात या मनोत्सवात उपक्रमात मार्गदर्शन केले जाणार आहे.

Mumbai
organizing manotsav for mental illness in mumbai
नवरात्रोत्सवानंतर मुंबईत मानसिक आजारांसाठी 'मनोत्सव'चं आयोजन

साधारणत: शारिरीक आजारांबाबत प्रत्येकाला माहिती असते. पण, आपण प्रत्येक जण मानसिक आजारानेही त्रस्त असतो हे आपल्याला माहित नसतं. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत उत्सवाचं वातावरण आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव आणि आता मुंबईत मनोत्वसाचं आयोजन केलं गेलं आहे. आता तुम्ही विचार करत असाल की आता हा कोणता नवा उत्सव आहे? भारतीय मानसोपचार परिषदेने मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील लोकांचं मानसिक स्वास्थ चांगलं राहावं यासाठी या उत्सवाचं आयोजन केलं जाणार आहे. मुंबईसह देशातील प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ या उत्सवात सहभागी होणार असून लोकांचा मानसिक आजारांपासून बचाव करण्यासाठी आणि त्यावर कशापद्धतीने उपचार घेतले जाऊ शकतात यावर मार्गदर्शन केलं जाणार आहे.

५ लाखांहून अधिक लोक मानसिक विकाराने पिडीत

भारतात उत्सवांना फार महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर, आईएसपी म्हणजेच भारतीय मानसोपचार परिषदेने सामान्य नागरिकांच्या मानसिक विकारांना दूर पळवण्यासाठी ‘मनोत्सव २०१९’ चं आयोजन केलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रात राहणारे नागरिक कोणत्या ना कोणत्या मानसिक विकाराने त्रस्त आहेत. तसंच, गेल्या एका वर्षात मुंबईत २४ टक्के लोक मानसिक आजारांनी त्रस्त असल्याचं समोर आलं आहे. तसंच, महाराष्ट्रात गेल्या दिड वर्षात ५ लाखांहून अधिक लोक मानसिक विकाराने पिडीत आहे. यासाठीच देशात या उत्सवाचं आयोजन केलं गेलं आहे.

मनोत्सवाद्वारे ‘या’ मानसिकतेला बदलणार

ठाणे मानसोपचार परिषदेचे अध्यक्ष आणि मनोविकार विशेतज्ज्ञ डॉ. दीपक राठोड यांनी सांगितलं की, “मानसिक आजारांनी ग्रस्त लोकांना एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघितलं जातं. मनोत्सवाद्वारे आम्ही याच मानसिकतेला बदलणार आहोत. तीन दिवसांच्या या उत्सवात डॉक्टरांचं समुपदेशन केलं जाणार आहे. जेणेकरुन समुपदेशक चांगल्या पद्धतीने समुपदेशन करु शकतील.”

देशातील प्रसिद्ध डॉक्टरांद्वारा अनेक लोकांना संबोधलं जाईल

सामान्य नागरिकांच्या मानसिक समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यासंबंधित जागरूकता वाढवण्यासाठी हा एक उपक्रम राबवला जाणार आहे. तसंच, दुसऱ्या दिवशी शिक्षक, समुपदेशक आणि डॉक्टरांसाठी वर्कशॉपचं आयोजन केलं गेलं आहे. देशातील प्रसिद्ध डॉक्टरांद्वारा अनेक लोकांना संबोधलं जाईल. डॉक्टरांमध्ये वाढलेला तणाव, मुलांमध्ये असलेल्या मानसिक समस्या जाणून घेण्याबाबत, शिवाय, त्यांची कशापद्धतीने काळजी घ्यायची आहे? या सर्व बाबींवर समुपदेशन आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे. या उत्सवाचं ११ ते १३ ऑक्टोबरदरम्यान आयोजन नवी मुंबईत करण्यात आलं आहे.